Nashik Ganesh Visarjan | नाशिक जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत कलम 163 लागू; विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्सवर पूर्णपणे बंदी!

Nashik Ganesh Visarjan | मिरवणुकीत लेझर लाइटच्या वापरावर निर्बंध लागू
DJ
DJPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी २८ सप्टेंबर, २०२६ पर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाइटचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

DJ
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असून, सुमारे २ हजार ६०३ सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.

गणेश मंडळांकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत विसर्जन मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. गणेशविसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगाने पोलिस ठाणे स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे व साउंड सिस्टिम मालक तसेच चालक यांना मिरवणुकीमध्ये लेझर लाइटचा वापर करू नये, आवाजाची मर्यादा नियंत्रित ठेवावी, मिरवणुकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

DJ
Maternity Benefit Scheme | कुपोषणमुक्तीकडे मोठे पाऊल; लाभार्थी संख्येत नाशिक जिल्हा राज्यात 'नंबर वन'

तसेच गणेशविसर्जन करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
लेझर लाइटच्या वापरामुळे नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मिरवणुकांमध्ये लेझर लाइटचा वापर पूर्णपणे टाळणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात शहर व ग्रामीण भागात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

२५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाइटचा वापर करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणेशविसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी गणेश मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

- रोहितकुमार राजपूत, अपर जिल्हादंडाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news