Nashik Theatre News | नाट्य परिषदेची सूत्रे पुन्हा प्रा. कदम यांच्या हाती

Nashik Theatre News | पंचवार्षिक निवडणुकीसाठी रंगभूमीच्या वाटचालीतून नवी पहाट
Nashik Theatre News
Nashik Theatre News
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अखिल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या मासिक सभेत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदावर पुन्हा प्रा. रवींद्र कदम यांची, तर प्रमुख कार्यवाहपदी सुनील ढगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.

Nashik Theatre News
Nashik Manikrao Kokate Case| माजी मंत्री कोकाटेंना लाभाचे पद घेण्यास मनाई

परिषदेच्या नाशिक शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील पंचवार्षिक निवडणूक २०२६-२०३१ बिनविरोध व्हावी, अशी भूमिका सभासदांनी घेतली होती. तसेच कार्यकारिणीतील नावेही ठरवली होती. त्यानुसार १९ जणांची नावे मध्यवर्ती शाखेकडे पाठविण्यात आलेली होती. पहिल्या मासिक सभेत कार्यकारिणीतील सदस्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले.

यात अध्यक्षपदावर प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष म्हणून डॉ. अनिरुद्ध धमर्माधिकारी, राजेश भुसारे, प्रमुख कार्यवाहपदी सुनील ढगे,

Nashik Theatre News
Goa News | कोरीव चिन्हांतून उलगडतील इतिहासाच्या पाऊलखुणा

खजिनदार : महेश डोकफोडे, तर सहकार्यवाह म्हणून राजेश जाधव, विजय शिंगणे आणि ईश्वर जगताप यांच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केले आहे. कार्यकारिणीत चंद्रकांत जाडकर, विजय रावळ, उमेश गायकवाड, विशाल जातेगावकर, अभय ओझरकर, श्याम लोंढे, पीयूष नाशिककर, विनोद राठोड, मोहिनी भागरे, आनंद जाधव, कृतार्थ कंसारा हे सदस्य काम करणार आहेत. याशिवाय सहा निमंत्रित सदस्यांमध्ये संजय भुजबळ, स्वप्नील तोरणे, श्रिया जोशी, विक्रम गवांदे,

लवकरच येत्या काही दिवसांत बालरंगभूमीसाठीसुध्दा स्वतंत्र्य कार्यकारिणी जाहीर होणार आहे. दरवर्षी सर्वसाधारण सभा होईल. त्यासाठी पुन्हा एकदा नव्याने कार्यकारिणी निवडली जाणार आहे.

रवींद्र कदम, अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news