Raksha Bandhan 2026 | नाशिकमध्ये रक्षाबंधनाची धूम! 10 रुपयांपासून लाखो रुपयांच्या राख्यांनी सजल्या बाजारपेठा

Raksha Bandhan 2026 | आज साजरा होणार रक्षाबंधन सण; शालिमार राखी बाजारात बहिणींची खरेदीसाठी गर्दी
Raksha Bandhan
Raksha Bandhan : बहीण-भावाच्या बंधनाला महागाईची झळ File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहीण-भावाच्या अतूट नात्याचा उत्सव असलेल्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा राख्यांच्या विविध रंगांनी सजल्या आहेत. आकर्षक डिझाइन, कार्टून, लायटिंग, अमेरिकन डायमंड, चंदन आणि इव्हिल आयसह विविध प्रकारच्या राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची बाजारात गर्दी होत आहे.

Raksha Bandhan
NASAKA Sugar Factory | नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा अडचणीत; शेतकरी-कामगारांसाठी खा. राजाभाऊ वाजे मैदानात

यंदा १० रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध असून, सर्वसामान्य ग्राहकांकडून १० ते ३० रुपयांच्या राख्यांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची व सुख-समृद्धीची कामना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो.

त्यामुळे या सणाला भावनिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शालिमार येथे राखी बाजारात खरेदीची लगबग वाढली आहे.
यंदा पौर्णिमा तिथी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०८ वाजता सुरू होऊन २८ ऑगस्ट रोजी सकाळी १.४७ वाजता समाप्त होत आहे.

पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी दिवसभर रक्षाबंधन साजरे करता येणार असल्याने खरेदीसाठी बहिणींची गर्दी वाढली आहे. भावाच्या आवडीचा रंग, डिझाइन आणि व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन राखी निवडीकडे बहिणींचा कल दिसून येत आहे.

राख्यांचे दर

  • कार्टून राख्या : १० रुपये

  • लायटिंग व आकर्षक कार्टून राख्या : ४० ते ७० रुपये

  • साध्यात धाग्यांच्या, मोती व कुंदन वर्क राख्या : १० ते १५० रुपये

  • चांदीच्या डिझायनर राख्या : १ हजार ते ५ हजार रुपये

  • सोन्याच्या प्रीमियम राख्या : २० हजारांपासून पुढे, लाखो रुपयांपर्यंत

  • इकोफ्रेंडली सीड राख्या : विविध किमतींमध्ये उपलब्ध होत्या

बहणींच्या खरेदीने बाजारपेठेत रंगत

रक्षाबंधनासाठी राख्यांची खरेदी करण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बहिणींची गर्दी वाढली आहे. विविध प्रकार, आकर्षक डिझाइन आणि वेगवेगळ्या किमतींमुळे ग्राहकांना पसंतीनुसार राखी निवडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सणाच्या दोन दिवस आधीच बाजारात खरेदीची लगबग वाढल्याने विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

कार्टून राख्यांचे लहान मुलांना आकर्षण

लहान मुलांसाठी बाजारात विशेष राख्यांची विविधता पाहायला मिळत आहे. छोटा भीम, स्पायडरमॅन, मिकी माऊस, डोनाल्ड डक यांसारख्या कार्टून पात्रांच्या राख्यांना मुलांकडून विशेष पसंती मिळत आहे. लायटिंग आणि चमकदार रंगांच्या राख्याही मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. सिल्व्हर व गोल्डन कोट असलेल्या राख्यांना त्यांच्या आकर्षक स्वरूपामुळे मागणी आहे.

Raksha Bandhan
NASAKA Sugar Factory | नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा अडचणीत; शेतकरी-कामगारांसाठी खा. राजाभाऊ वाजे मैदानात

विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध

बाजारात गोंडा राखी, राजस्थानी राखी, रेशीम राखी, स्टोन राखी, डिस्को लाइट राखी, चंदन राखी, अमेरिकन डायमंड आणि इव्हिल आय राख्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पारंपरिक राख्यांसोबत आधुनिक डिझाइनच्या राख्यांना तरुणाईकडून पसंती दिली जात आहे. काही दुकानांमध्ये भावाच्या नावाची किंवा वैयक्तिक संदेश असलेली राखीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इकोफ्रेंडली राख्यांना मागणी

पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराकडे वाढता कल पाहता यंदा सीड राख्याही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या राख्यांमध्ये बियांचा वापर केला जात असल्याने रक्षाबंधनानंतर त्या मातीत लावता येतात. त्यामुळे पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या या राख्यांकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे.

बहिणी-बहिणींच्या राखीलाही पसंती

राखी बांधण्याची परंपरा केवळ भाऊ-बहिणीपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक बहिणी एकमेकींच्या मनगटावर राखी बांधून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आयुष्यभर साथ देण्याचा संकल्प व्यक्त करीत आहेत. त्यामुळे बहिणी-बहिणींसाठीच्या राख्यांनाही बाजारात पसंती मिळत आहे. विशेषतः मैत्रीपूर्ण आणि आकर्षक डिझाइनच्या राख्यांची खरेदी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news