QR Code Ration Card System | पारंपरिक रेशन कार्डऐवजी क्यूआर कोड प्रणाली

महसूल समाधान शिबिरात तीन हजार ११ लाभांचे वितरण
QR Code Ration Card System
येवला : एरंडगाव येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करताना मंत्री छगन भुजबळ.
Published on
Updated on

येवला : संतोष घोडेराव

शासनाने पारंपरिक कागदी रेशनकार्डऐवजी क्यूआर कोडयुक्त स्मार्ट रेशनकार्ड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या डिजिटल कार्डमुळे रेशन वितरणप्रणाली अधिक पारदर्शक, वेगवान होणार असून, बोगस लाभार्थ्यांना आळा बसून जुनी कागदी कार्ड खराब होणे किंवा हरवणे यांसारख्या समस्यांमधून नागरिकांची सुटका होणार आहे. या स्मार्ट रेशनकार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

QR Code Ration Card System
Frozen Embryos | गोठवलेले २४ भ्रूण अन्य केंद्रात हलविणार

तालुक्यातील एरंडगाव येथील वर्मा लॉन्स येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, पुरवठा उपआयुक्त प्रशांत काळे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड उपस्थित होते. मंत्री भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही केवळ कार्यालयीन प्रक्रियेपुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या दारी पोहोचली पाहिजे. शासनाने पारंपरिक कागदी रेशनकार्डऐवजी क्यूआर कोडयुक्त स्मार्ट रेशनकार्ड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या डिजिटल कार्डमुळे रेशन वितरणप्रणाली अधिक पारदर्शक, वेगवान होणार असून, बोगस लाभार्थ्यांना आळा बसून जुनी कागदी कार्ड खराब होणे किंवा हरवणे यांसारख्या समस्यांमधून नागरिकांची सुटका होणार आहे. या स्मार्ट रेशनकार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील एरंडगाव येथील वर्मा लॉन्स येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, पुरवठा उपआयुक्त प्रशांत काळे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड उपस्थित होते. मंत्री भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही केवळ कार्यालयीन प्रक्रियेपुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या दारी पोहोचली पाहिजे महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आवश्यक सेवा, प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ तत्काळ मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत आहे. पारदर्शक, उत्तरदायी आणि संवेदनशील प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी प्रस्ताविकात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व योजनांची माहिती दिली. पंचायत समिती, कृषी, सहकार, महसूल, सामाजिक न्याय, भूमी अभिलेख नगरपालिका, आरोग्य, पशुसंवर्धन, महावितरण, वन, आधारकार्ड, दुय्यम निबंधक, एकात्मिक बालविकास, महिला बचतगट, आरोग्य तपासणी अशा २२ स्टॉल्सला भेट देत योजनांची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली.

QR Code Ration Card System
Government Hospital Star Rating |राज्यात शासकीय रुग्णालयांना मिळणार आता 'स्टार रेटिंग'..!

शिबिरात या विभागाचे असे लाभ

अधिवास, जात, उत्पन्न- २०० दाखल्यांचे वितरण

पंचायत समिती दिव्यांग - १० सायकली, २५० घरकुल

प्रधानमंत्री आवास योजना - १० कुटुंबांना लाभ

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान १०० जणांना

पीएम स्वनिधी योजना २० कर्ज प्रकरणे

जन्म दाखले ५० जणांना वितरण

आयुष्मान भारतकार्ड - १५० जणांना वितरण

मालमत्ता उतारा ५० जणांना वितरण

बेबी केअर किट - १० बालकांना वितरण

प्रधानमंत्री मातृवंदना २० जणांना लाभ

लेक लाडकी योजना - ५० जणांना लाभ

सौरकृषी पंप योजना -

२५ शेतकऱ्यांना लाभ

पीएम सूर्यघर योजना

१३० नागरिकांना सेवा

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना

१०० जणांना लाभ

वन्यप्राणी नुकसानभरपाई १०

प्रकरणे निकाली

कृषी विभाग - ५० ट्रॅक्टर, ५० रोटाव्हेटर, ५० मळणीयंत्र

विविध योजना लाभांचे वितरण

महसूलमार्फत लक्ष्मी मुक्त्ती योजना, बंडिंग बोजे कमी करणे, पोटखराब क्षेत्र वहितीखाली आणणे, जिवंत सातबारा व इतर नोंदी अंतर्गत ५०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. संजय गांधी निराधार, विधवा, अपंग व वृद्धापकाळची ६ प्रकरणे मंजूर केली. पुरवठा शाखेमार्फत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, नवीन व ड्युप्लिकेट रेशनकार्ड अशा १०० सेवा देण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १०० लाभार्थ्यांना लाभ, २०० सुवर्ण कार्डाचे वितरण करण्यात आले. वन्यप्राणी नुकसानभरपाईची १० प्रकरणे निकाली काढली. भूमी अभिलेख विभागामार्फत १०० सदनिकांचे वितरण, २० मोजणी प्रकरणांची पूर्तता केली. शिबिरात एकूण तीन हजार ११ लाभ व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या लाभांचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news