Manmad Double Murder Case | मनोरुग्णाकडून झोपलेल्या दोघांचा खून

Manmad Double Murder Case | मनमाडमधील बसस्थानक परिसरातील प्रकाराने खळबळ
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

एका माथेफिरूने सोमवारी (दि.२२) पहाटेच्या सुमारास दोन जणांचा निघृण खून केला. या दुहेरी हत्याकांडाने शहरात दहशत निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांच्या डोक्यात दगड घालून आरोपीने निघृणपणे खून केल्यानंतर फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात त्याच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले. खून झालेल्यांपैकी एकाची ओळख पटली असून, दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Crime News
Kosari Double Murder Case : साक्ष द्यायला निघाला... अन्‌‍ जिवाला मुकला

आरोपी मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने दोघांचा खून का केला, याचा पोलिस तपास करीत आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री २ च्या सुमारास सचिन इमले (रा. श्रीराम चौक), रितेश वैरागर (रा. चंदनवाडी) आणि प्रशांत देवरे (रा. मालेगाव) या तिघांनी पोलिस ठाण्यात येत शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गालगत एचपी पेट्रोलपंपासमोर एक वेडसर व्यक्ती झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मोठमोठे दगडे टाकून मारहाण करत असल्याचे सांगितले. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने दगडफेक केली.

Crime News
Junnar Crime: जुन्नरमध्ये खळबळ; विवाहितेचा खून करून आत्महत्येचा बनाव, पती ताब्यात

ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथे एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर याच व्यक्तीने भारत पेट्रोलपंपाजवळ एस. टी. स्टॅण्ड वॉलकम्पाउंडलगत दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून फरार झाला होता. एसटी स्टॅण्डजवळ खून झालेल्या व्यक्तीच्या खिशात मिळालेल्या वस्तू वरून त्याची ओळख पटली असून, त्याचे नाव बाळू प्रल्हाद अमृतसागर असे आहे.

तो धुळे जिल्ह्यातील राजवाड खेडा येथील रहिवासी असून, दोघांना ठार मारून आरोपी फरार झाला. मात्र, पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेऊन अवघ्या अर्ध्या तासात त्याला रेल्वे ब्रिजखालून ताब्यात घेतले व गजाआड करण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव मनोज नंदू बोमराज असून, तो मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षक विजय करे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news