Taiwan Pink Guava Farm | मोह येथे तौवान पिंक पेरूच्या बागेत तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग

Taiwan Pink Guava Farm | भिसे यांच्या शेतीला शेतकऱ्यांची भेट; नैसर्गिक शेतीसह स्मार्ट हवामान यंत्रणेची घेतली माहिती
Guava
GuavaPudhari
Published on: 
Updated on: 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नैसर्गिक शेतीचा ध्यास आणि सातत्याने नववीन प्रयोग करण्याची वृत्ती यातून शेती समृद्ध होऊ शकते, याचा प्रत्यय महाराष्ट्र कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी सुनील भिसे यांच्या विठ्ठल फार्म येथे आला. मोह येथील त्यांच्या तौवान पिंक पेरूच्या बागेला शेतकरी प्रतिनिधींनी सदिच्छा भेट देत शेतीतील विविध प्रयोगांची माहिती घेतली.

Guava
Dengue Outbreak | सिन्नर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक तीव्र; एका महिन्यात 11 नवीन रुग्णांची नोंद

भिसे यांनी आपल्या शेतात तौवान पिंक जातीच्या पेरूची उत्कृष्ट बाग फुलवली आहे. बागेचे नियोजन, फळांचे संरक्षण, दर्जेदार उत्पादन आणि आधुनिक व्यवस्थापन यामुळे ही बाग लक्षवेधी ठरत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतात हवामानावर आधारित स्मार्ट निरीक्षण यंत्रणा बसवण्यात आली आहे.

हवेची दिशा, वाऱ्याचा वेग, वातावरणातील व जमिनीचे तापमान, पावसाची शक्यता तसेच पिकांना आवश्यक पाण्याची माहिती मोबाइलवर उपलब्ध होते. जवळपास दीड किलोमीटर परिसरातील हवामानातील बदलांची माहिती मिळत असल्याने फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि बागेच्या निगेबाबत योग्य निर्णय घेणे शक्य होते.

या भेटीत विठ्ठल रुक्माई नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे अध्यक्ष तथा ब्राह्मणवाडेचे पोलिसपाटील कमलाकर रामराजे, बीआरसी प्लांटधारक तथा प्रगतशील शेतकरी अशोक आनंदा वाघ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिका माळी यांच्यासह शेतकरी मित्र सहभागी झाले होते.

सुनील भिसे यांनी शेतीत केलेले प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक समृद्ध होऊ शकते, असा संदेश या भेटीतून मिळाला.

बीआरसी प्लांट; १४ प्रकारच्या जैविक निविष्ठांची निर्मिती

नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणाऱ्या भिसे यांनी शेतात स्वतःचा बीआरसी प्लांट उभारला आहे. या प्लांटमध्ये तब्बल १४ प्रकारच्या जैविक निविष्ठा आणि जैविक कीड नियंत्रक उत्पादने तयार केली जातात. त्यांचा वापर ते स्वतःच्या फळबागेसह विविध पिकांवर करतात. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून जैविक निविष्ठांच्या माध्यमातून शेती करण्याचा त्यांचा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

Guava
Sinnar Ration Card eKYC | सिन्नर तालुक्यात ई-केवायसीअभावी 23 हजार 501 लाभार्थ्यांचे रेशन आले धोक्यात

पेरूची चव चाखत प्रयोगांची माहिती

भेटीदरम्यान शेतकरी प्रतिनिधींनी पेरूच्या बागेची पाहणी केली. झाडावरील ताज्या तौवान पिंक पेरूची चव चाखण्याचाही आनंद घेतला. फळांचा दर्जा आणि चव याचे उपस्थितांनी कौतुक केले. हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि कीड-रोगांच्या समस्यांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत नैसर्गिक शेतीचे प्रयोग महत्त्वाचे असल्याचे जाणवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.