Nashik Simhastha Kumbh Mela | भारताच्या सनातन संस्कृतीचा सिंहस्थ जागतिक आविष्कार; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Nashik Simhastha Kumbh Mela | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू : मराठीतून अभिवादन करत जिंकली मने
Kushavarta Teerth Singhastha Flag Worship
Nashik Simhastha Kumbh Mela | भारताच्या सनातन संस्कृतीचा सिंहस्थ जागतिक आविष्कार; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या प्राचीन सनातन संस्कृतीची समृद्ध परंपरा, आध्यात्मिक एकात्मता आणि सामाजिक समरसतेचे दर्शन घडवणारा कुंभमेळा जगासाठी भारताची सांस्कृतिक वैभवाची ओळख आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. भाषणाच्या प्रारंभी 'पवित्र नाशिकनगरीला माझा नमस्कार' असे मराठीतून अभिवादन करीत त्यांनी उपस्थांची मने जिंकली.

Kushavarta Teerth Singhastha Flag Worship
Simhastha kumbh mela nashik 2027| ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई

सिंहस्थ कुंभमेळा धर्मध्वजारोहण सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी गोडेची महाआरती केली. कुशवर्त तीर्थ येथे ध्वजस्तंभ पूजन केले. त्यांच्या हस्ते नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे तसेच कुंभमेळ्याच्या विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

या ऐतिहासिक सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जगद्गुरु नरेंद्रचार्य, जगद्गुरु माधवाचार्य, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह १३ आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते.

राष्ट्रपती मुर्मू यांनी नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा विशेष उल्लेख केला. नाशिक-त्र्यंबकेश्वरची भूमी शिवभूमी, तपोभूमी आणि वीरभूमी आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासाकाळात पंचवटीत वास्तव्य केले. भगवान त्र्यंबकेश्वर आणि माता गोदावरीच्या पावन सान्निध्यामुळे या भूमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोदावरीच्या पवित्र प्रवाहातून समृद्धीचे आशीर्वाद मिळतात, असे त्या म्हणाल्या.

हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे शतकानुशतके कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे. या उत्सवांमधून भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मता जगामोहर येते, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, साल्हेर किल्ल्याचा इतिहास, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी तसेच चाफेकर बंधु, अनंत कान्हेरे आणि दादासाहेब पोतनीस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख केला.

संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक एकता आणि समरसतेचा संदेश दिला.
महिलांचे शिक्षण आणि वंचितांच्या उत्थानासाठी महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवल्याचे नमूद करत देशाच्या अर्थकारणात महाराष्ट्राचे १५ टक्के योगदान असल्याचे त्या म्हणाल्या.

गोदावरी आरतीमध्ये ६५० गावांतील साडेसहा हजार आदिवासी बांधव सहभागी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. हवामान बदलामुळे जगभरात संकटें निर्माण होत असून, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. पर्यावरण संरक्षण, नदी स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी नागरिकांनी सातत्याने योगदान द्यावे. सिंहस्थ कुंभमेळा स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Kushavarta Teerth Singhastha Flag Worship
Nashik Simhastha Kumbh Mela | ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज; गोदातीर, मंदिरे आणि ऐतिहासिक होळकर पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई

गोदा स्वच्छतेला प्राधान्य द्या : राज्यपाल

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सिंहस्थ कुंभमेळा हा सनातन संस्कृतीचे प्रतीक असून भाषा, जात आणि पंथाचे भेद विसरून कोटींच्या भाविकांना एक आध्यात्मिक सूत्रात बांधणारा उत्सव असल्याचे सांगितले. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात नाशिकचे विशेष स्थान आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले. नाशिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबरच गोदावरी नदीचे प्रदूषण रोखणेही आवश्यक आहे.

विकासकामांना गती देणार : उपमुख्यमंत्री शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मध्वजारोहण सोहळा ऐतिहासिक आणि अलौकिक असल्याचे सांगितले. राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणे हा सिंहस्थाच्या स्वर्णिम इतिहासातील नवा अध्याय आहे. तपस्वी मातृशक्तीच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणे हा सनातन संस्कृतीतील नारीशक्तीचा सर्वोच्च सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कुंभमेळा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.