Simhastha kumbh mela nashik 2027| ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई

ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! गोदावरी महाआरतीच्या सोहळ्यासाठी गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई
Simhastha kumbh mela nashik 2027
गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई करण्यात आलीPudhari Photo
Published on: 
Updated on: 

Nashik Ready For Simhastha Kumbh Flag Hoisting

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३१) नाशिकमधील रामकुंड येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. दुपारी १२.०२ वाजता ध्वजारोहण, सायंकाळी गोदावरी तीरावर भव्य महागोदा आरती होणार आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्यानिमित्त गोदाघाट परिसर, मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येत आहे. या संपूर्ण कामात नाशिकमधील इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंट कंपनी महत्त्वाची भूमिका बजावित आहे. या कंपनीच्या माध्यमातून विद्युत रोषणाई, एलईडी लाइटिंग, आवश्यक तांत्रिक व्यवस्था आणि इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चरची कामे करण्यात येत आहेत.

गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर पूल आकर्षक रोषणाईने उजळून निघणार आहे. गोदातीर परिसराला विशेष प्रकाशसौंदर्य प्राप्त होणार आहे. घाट परिसरातील मंदिरे, धार्मिक स्थळे आणि गोदाकाठावरील वास्तूंचे सौंदर्य उठावदार पद्धतीने अधोरेखित करण्याचे नियोजन आहे.

आधुनिक प्रकाशयोजनेच्या माध्यमातून नाशिकचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा अधिक आकर्षक स्वरूपात समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ध्वजारोहण आणि महा गोदाआरतीसाठी देशभरातून भाविक, साधू महंत आणि मान्यवर नाशिकमध्ये येण्याची अपेक्षा आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रकाशयोजना आणि तांत्रिक व्यवस्थेला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान, या कामाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नागरिकांना रोजगारनिर्मिती झाली आहे. या कामासाठी १२०० स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. इलेक्ट्रिशियन, लाइटिंग तंत्रज्ञ, फिटर, ऑपरेटर, सहायक कर्मचारी आणि विविध तांत्रिक कामांत स्थानिक मनुष्यबळाला संधी मिळत आहे.

विशेष म्हणजे, नाशिकमधील एलईडी लाइटिंग, एलईडी स्क्रीन आणि इव्हेंट प्रॉडक्शन क्षेत्रातील अनेक स्थानिक विक्रेते व व्यावसायिक या कामात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या कामातून स्थानिक व्यावसायिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळत आहेत.

स्थानिक व्यावसायिकांच्या क्षमतेला व्यासपीठ

नाशिकच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच स्थानिक उद्योग आणि रोजगाराला चालना देणारा हा उपक्रम ठरण्याची अपेक्षा असून, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांसाठी आवश्यक असलेली तांत्रिक व्यवस्था, विद्युत रोषणाई, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि इव्हेंट इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची क्षमता नाशिकमध्येच उपलब्ध असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे.

स्थानिक कंपनीच्या नेतृत्वाखाली विविध स्थानिक विक्रेते, तंत्रज्ञ आणि कामगार एकत्रित काम करीत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाचा हा सोहळा नाशिकच्या धार्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे. गोदातीरावरील भव्य आरती, ऐतिहासिक वास्तूंवरील रोषणाई आणि स्थानिक मनुष्यबळाचा सहभागामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

एकलहरेच्या आवर्तनातून ध्वजारोहणासाठी पाणी

पाणी आरक्षण बैठकीत निर्णय; गोदावरीत आज ३०० ते ३५० क्यूसेकने आवर्तन

नाशिक - सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीपात्रात गुरुवारी (दि. २९) मध्यरात्रीपासून गोदावरीत एकलहरेच्या आवर्तनातून ३०० ते ३५० क्यूसेकने आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या आवर्तनाचा उपयोग ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठीही केला जाणार आहे. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पासह नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यासाठी वनविभागाने पाण्याची मागणी केली आहे.

Simhastha kumbh mela nashik 2027
Simhastha kumbh mela nashik 2027| 'महाआरती'मधून विक्रमाला घालणार गवसणी, रामतीर्थ येथे गोदापूजन

गोदाकाठच्या १० ते ग्रामपंचायतींच्या पाणीपुरव योजनांसाठी आणि काही शेतकऱ्यां सिंचनासाठी पाणी मागितले आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोडण्या येणाऱ्या आवर्तनामुळे रामकुंड परिसर ध्वजारोहण आणि महाआरतीच्या वेळ पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आ दरम्यान, सिंहस्थ काळात गोदावरी पुरेसा पाणीसाठा कायम राहाव यासाठी रामकुंड परिसर कायमस्वरूपी उपाययोजना करण्या मागणी पुरोहित संघाने केली आ त्यासाठी ६३५ एमसीएफटी पाण्य स्वतंत्र आरक्षण मंजूर करण्य आले आहे.

Simhastha kumbh mela nashik 2027
Simhastha kumbh mela nashik 2027 |कुंभमेळा पार्श्वभूमीवर इगतपुरीतील सर्वतीर्थ टाकेदला १७ कोटींचा निधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.