Polio Vaccination : नाशिकमध्ये ३ मार्चला पोलिओ लसीकरण, 2 लाख बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट

Polio Vaccination : नाशिकमध्ये ३ मार्चला पोलिओ लसीकरण, 2 लाख बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रात येत्या ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील पाच वर्षाच्या आतील दोन लाख १२६ बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात सोमवारी (दि.२६) आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. शहरात ८७६ पोलिओ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत. याशिवाय ६५ ट्रान्झिट टीम तसेच ४२ मोबाइल टीम असणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येते. पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान ही मोहीम राबविली जाईल. या मोहिमेत जी बालके पोलिओ डोसपासून वंचित राहतील, त्यांना ४ ते ८ मार्चदरम्यान आयपीपीआयअंतर्गत गृहभेटी, मोबाइल टीम, ट्रान्झिट टीम, नाइट टीमद्वारे डोस दिला जाईल, असे नियोजन झाले आहे. या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, प्रशांत शेटे, शिक्षण अधिकारी बी. टी. पाटील, जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. प्रकाश नांदापूरकर, रोटरी क्लबचे मंगेश अपेक्षांकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news