पाचशे रुपये न दिल्याने बायकोने नवर्‍यावर केला चाकूहल्ला | पुढारी

पाचशे रुपये न दिल्याने बायकोने नवर्‍यावर केला चाकूहल्ला

पुणे : आपल्याला पाचशे रुपये दिले नाहीत या रागातून बायकोने नवर्‍यावर चाकूहल्ला केल्याची घटना पुण्यातील भवानी पेठ परिसरात घडली आहे. यात नवरा जखमी झाला असून बायकोविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे असे तिचे नाव आहे.

रमेश कामावरून परतल्यानंतर त्यांनी जया हिला जेवण वाढायला सांगितले. त्यावेळी तिने पाचशे रुपयांची मागणी केली. त्याला नकार दिल्यानंतर तिने जेवणाचे ताट आणि तांब्या जोरात आपटला. त्यामुळे वाद वाढला. रागाच्या तिरमिरीत तिने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि रमेश यांच्यावर वार केले. यात त्यांच्या दंडावर, पाठीवर जखमा झाल्या आहेत. नंतर जखमी अवस्थेत त्यांनी पोलिस ठाणे गाठले व बायकोविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Back to top button