Nashik Policeman 25000 Bribe ACB Action| पोलिस कर्मचाऱ्याने मागितली २५ हजारांची लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
money
money pudhari file photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तक्रारदाराकडे प्रलंबित असलेल्या कामाच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २५ हजार रुपये घेण्याचे मान्य केल्याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यासह अन्य एकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध सुरगाणा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी रमेश चव्हाण (३७, नेमणूक सुरगाणा पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण) व जगदीश जाधव (३०, नेमणूक सुरगाणा पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराकडे त्यांच्या कामाच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

दि. २५ ऑक्टोबर रोजी सुरगाणा बसस्थानक परिसरात पडताळणीची प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये लाचमागणीचा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात लाचेची रक्कम प्रत्यक्ष घेतल्याची नोंद नसून, स्वीकारलेली रक्कम निरंक असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

money
6 Nashik Teachers State Award | नाशिकच्या ६ शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार

या कारवाईत पोलिस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलिस हवालदार विलास निकम तसेच पोलिस पथकाने सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक प्रदीप मिरचे आणि अपर पोलिस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

money
Nashik Water Tanker Supply Restrictions |संभाव्य पाणीकपातीत टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरही आता निर्बंध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.