6 Nashik Teachers State Award | नाशिकच्या ६ शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार

३ डिसेंबरला मुंबईत होणार वितरण
Teacher
TeacherPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०२५-२६ च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली असून, या पुरस्कारांसाठी नाशिक जिल्ह्यातील सहा शिक्षकांची निवड झाली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासह आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, आदर्श शिक्षिका आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी नाशिकच्या शिक्षकांनी राज्यस्तरावर मानांकन मिळविले आहे.

निवड पुरस्कारासाठी झालेल्यांमध्ये प्राथमिक शिक्षक प्रवर्गातून देवेंद्र वसंतराव वाघ (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवीचामाथा, ता. निफाड) यांची निवड झाली आहे. माध्यमिक शिक्षक प्रवर्गातून विनीत धर्मराज पवार (जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सातपूर, नाशिक) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रवर्गात नरेंद्र तुकाराम सोनवणे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जऊळके दिंडोरी, ता. दिंडोरी) आणि अतुल अशोकराव आहिरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरटेंभे, ता. इगतपुरी) यांची निवड झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी शीतल नागोराव बावने (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोकणगाव, ता. निफाड) यांची निवड करण्यात आली आहे.

तर विशेष शिक्षक क्रीडा प्रवर्गातून अमोल सुधाकर जोशी (पेठे विद्यालय, रविवार कारंजा, नाशिक) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी १९६२-६३ पासून राज्यात ही पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. यंदाच्या पुरस्कारांचे वितरण ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

Teacher
Nashik Crime Case | व्याजाच्या पैशांसाठी सतत धमक्या; मानसिक त्रासाला कंटाळून कैलास शिंदे यांचे टोकाचे पाऊल

राज्यभरातील १२३ शिक्षकांना पुरस्कार

राज्य शासनाने यंदा विविध आठ प्रवर्गात एकूण १२३ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये प्राथमिक ३८, माध्यमिक ३९, आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक १९, आदर्श शिक्षिका आठ, विशेष शिक्षक कला आठ, विशेष शिक्षक क्रीडा आठ, दिव्यांग शिक्षक अथवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट गाईड दोन अशा पुरस्कारांचा समावेश आहे.

Teacher
Nashik Water Crisis | नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचा हाहाकार! 10 दिवसांत टँकरवर अवलंबून नागरिकांची संख्या 30 हजारांनी वाढली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.