Pitru Paksha | पितृपक्षास आजपासून प्रारंभ! जाणून घ्या श्राद्धाच्या तिथी अन् मुहूर्त

Pitru Paksha | अन्नदानातून जोपासली जाते श्रद्धा, सेवाभावाची परंपरा
Pitru Paksha
Pitru Paksha
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय परंपरेनुसार भाद्रपद कृष्णपक्ष रविवार (दि. २७) पासून प्रतिपदा श्राद्धानुसार आपापल्या पूर्वजांचे स्मरण करत पितृपक्षास प्रारंभ होत आहे. तर शनिवारी (दि. १०) भाद्रपद सर्वपित्री आमावास्येने पितृपक्षाची सांगता होणार आहे. पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध, तर्पण, पिंडदान करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची परंपरा या कालावधीत पार पाडली जाते. या काळात आश्रमात अन्नदानदेखील करतात.

Pitru Paksha
Nashik Ganpati Visarjan 2026: नाशिक पोलिसांचा दणका, अतिरिक्त ढोल पथकांना मिरवणुकीतून बाहेर काढलं; एक मंडळ- एक ढोलपथकाचा नियम

पितृपक्षात आपापल्या घराण्यातील संबंधित पूर्वजांचा ज्या-ज्या तिथीला मृत्यू झाला असेल, त्या तिथीला शक्यतो दुपारी १२ नंतर श्राद्ध करण्याची प्रथा आहे. मृत्यूची तिथी माहीत नसल्यास सर्वपित्री अमावास्येला सर्व ज्ञात-अज्ञात पूर्वजांचे स्मरण करून पितरांचे श्राद्ध करता येत असते. पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या चंद्र तिथीनुसार करणे अशी परंपरा आहे.

त्या दिवशी प्रामुख्याने श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. श्राद्धासाठी अपराह्न काळ (म्हणजेच दुपारी १२ ते ३) हा महत्त्वाचा काळ मानला जातो. काही प्रसंगानुसार त्याआधीसुद्धा तर्पण केले तरी चालत असल्याची माहिती ज्योतिषाचार्यांनी दिली.

पूर्वजांची मृत्यूची तिथी माहीत नसल्यास किंवा विसरली असल्यास सर्वपित्री आमावास्येला सामूहिक श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे. शनिवार, दि. १० ऑक्टोबरला सर्वपित्री आमावास्या असून,

नाशिक परिसरासाठी मुहूर्त सुमारे सकाळी ११:५५ ते १२:४२ असा देण्यात आला आहे. श्राद्धानंतर कावळ्याला अन्नाचा घास देण्याची प्रथा आहे. कावळा उपलब्ध न झाल्यास गायीस अन्न देणे, तसेच गरजू व्यक्ती, ब्राह्मण किंवा अन्य जीवांना अन्नदान करणे, ही श्रद्धेने करता येणारी सेवा मानली जाते.

"पितृपक्षाकडे केवळ भीती किंवा दोषनिवारण म्हणून न पाहता, आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि कुटुंबीयांना आपल्या संस्कारांची जाणीव करून देणारी परंपरा म्हणून पाहणे अधिक अर्थपूर्ण आहे. श्रद्धा, साधेपणा आणि सेवाभाव हेच या विधीचे खरे सार आहे."

- डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष-धर्मशास्त्रतज्ज्ञ

Pitru Paksha
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

मांगलिक कार्ये टाळण्याची परंपरा

पितृपक्षात विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती यासारखी मांगलिक शुभकार्ये टाळण्याची परंपरा आहे. हा काळ उत्सवापेक्षा पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता, तर्पण, दान आणि आत्मचिंतनासाठी राखला जातो. त्यामुळे अनेक कुटुंबांत या काळात विवाह, वास्तुशांती, गृहप्रवेश यासारखी शुभकार्ये टाळण्याची परंपरा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news