Illegal  Gas Cylinder Seized | पिंपळगावला विनापरवाना 100 गॅस सिलिंडर जप्त..!

Illegal  Gas Cylinder Seized | पोलिसांची कारवाई : ९ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
LPG Cylinder Price
LPG Cylinder Pricefile photo
Published on: 
Updated on: 

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पिंपळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. मुंबई - आग्रा महामार्गावरील सिद्धार्थनगर परिसरात केलेल्या या कारवाईत घरगुती वापराचे १०० गॅस सिलिंडर आणि वाहतुकीसाठी वापरलेले पिकअप वाहन असा एकूण नऊ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LPG Cylinder Price
Jalna road condition : पिंपळगाव रेणुकाई- धावडा रस्त्याची दुरवस्था

पिंपळगाव पोलिसांना घरगुती गॅस सिलिंडरची विनापरवाना वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी सिद्धार्थनगर परिसरात सापळा रचून संशयास्पद वाहनावर लक्ष ठेवले. यावेळी पोलिसांनी संशयास्पद पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता, त्यात घरगुती वापराचे गॅस सिलिंडर आढळले.

पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित पिकअप वाहनातून प्रत्येकी १४.२ किलो वजनाचे घरगुती गॅस सिलिंडर वाहून नेले जात असल्याचे आढळले. या प्रकरणात एकूण १०० गॅस सिलिंडर आणि वाहतुकीसाठी वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन जप्त केले. त्याची एकूण किंमत नऊ लाख ३४ हजार ६०० रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

LPG Cylinder Price
Jalna Agriculture News : पिंपळगाव रेणुकाई परिसरात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

कारवाईमुळे परिसरात चर्चा:
गॅस सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवानगी व संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास भोर, पोलिस कर्मचारी विकास वाळुंज, योगेश देशमुख आणि नितीन गाढवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात लक्ष वेधले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news