

लासलगाव : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून, दर कोसळले आहेत. देशात कांदा दर ठरवणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी १०५१ रुपये प्रतिक्विटल दर मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय मागणीत घट आणि निर्यातीत झालेल्या मोठ्या पसरणीमुळे देशातील पाऊक बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. एप्रिल २५ ते जानेवारी २०२६ पर्यंत देशातून १२ लाख ८३ हजार ४७३ मे. टन कांदा निर्यात होऊन २९७० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे जाणारी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. परिणामी, निर्यात मंदावल्याने देशातील बाजारपेठेत कांद्याचा साठा वाढला असून, घाऊक बाजारात दर घसरले आहेत, निर्यातदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकन्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निर्यातदार विकास सिंग यांनी स्पष्ट केले, केंद्राने समन्वय साधून निर्वात धोरण स्थिर करणे, निर्यात प्रोत्साहन दर वाढवणे, किमान ७ टोक वाहतूक अनुदान देणे, आधुनिक साठवण सुविधा उभारणे आणि चंदर व लॉजिस्टिक व्यवस्थेत सुधारणा करण्याचे विचार करणे आवश्यक आहे.
नाशिक जिल्ह्यातून कांदा निर्यात कमी प्रमाणात होत असल्याने त्याचा बेट परिणाम शहरातील व्यापारावर झाला आहे. शेतकयांच्या हातात पैसा असेल तरच बाजारात खरेदी होते. ती होत नसल्याने इतर व्यवसायिकही आर्थिक संकटात सापडले.
मागील सात वर्षांत झालेली कांदा निर्यात
२०१८-१९ - २१.८३ लाख टन ३४६८ कोटी
२०१९-२०-११.४९ लाख टन २३४० कोटी
२०२०-२१-१५.७७ लाख टन २८२६ कोटी
२०२१-२२-१५.३७ लाख टन ३४३२ कोटी
२०२२-२३-२५.२५ लाख टन ४५२२ कोटी
२०२३-२४-१७.१७ लाख टन ३९२२ कोटी
२०२४-२५-११.४७ लाख टन ३८२२ कोटी
२०२६ जानेवारीपर्यंत १२.८३ लाख टन २९७० कोटी
निर्यातीत घट, साठ्यात वाढ
खाडी देशांत निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे भारतातून होणारी कांद्याची निर्यात कमी झाली आहे. परिणामी, जे कांदे बाहेर जाणार होते ते देशांतर्गत बाजारातच राहिल्याने पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बाजारातील संतुलन बिपडले असून, दर कोसळले आहेत.
घाऊक दरांवर मोठा परिणाम
घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. अनेक ठिकाणी दर उत्पादन खर्चाच्या खाली गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे आणि आर्थिक संकट तीव्र झाले आहे. निर्यातीसोबतच देशांतर्गत मागणीही काही प्रमाणात झाली आहे, मोठ्या खरेदीदारांकडून मागणी घटल्यामुळे बाजारातील दबाव आणखी बाढला आहे. याचा थेट परिणाम घाऊक दरांवर झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. यात निर्यात वाढवण्यासाठी प्रोत्साहन बाजारात हस्तक्षेप करून खरेदी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.