October Heat Maharashtra | राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; नाशिकचे तापमान 35.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले

October Heat Maharashtra | थंड हवेचे नाशिक तापले : 20 ऑक्टोबरपासून दिलासा मिळण्याची शक्यता
October Heat
October Heat Pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक तीव्र झाला असून, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाने सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी वाढ नोंदवली आहे. नाशिकमध्येही कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने दुपारच्या उन्हाची तीव्रता वाढली आहे.

October Heat
Nashik Ration Card Cancellation | नाशिक जिल्ह्यात ऐन दुष्काळात 2.40 लाख रेशनकार्ड बंद; धान्यापासून वंचित गोरगरीब संकटात

विदर्भात तापमानाचा पारा ३९ अंशांवर गेला असून, मुंबई आणि रत्नागिरीतही उष्णतेची वाट आहे. मात्र, २० ऑक्टोबरपासून कमाल तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
साधारणतः ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. यंदा मात्र अनेक भागात तापमानाने सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. खानदेश, पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.

मान्सूनच्या माघार्यानंतर आकाश निरभ्र राहणे आणि उष्ण व कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव वाढणे, यामुळे तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील विविध विभागांचा विचार करता, मुंबईसह कोकणातील अनेक भागात कमाल तापमान ३३ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

हे तापमान सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात खानदेशसह नाशिक ते सोलापूरदरम्यानच्या दहा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांच्या दरम्यान असून, सरासरीच्या तुलनेत २ ते ४.५ अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

October Heat
Divyang School Recruitment Scam| नाशिक, धुळे अन् जळगावात दिव्यांग शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उघडकीस!

रात्रीच्या उकाड्यात वाढ:

दिवसाच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली असली, तरी सध्या राज्यातील अधिकांश भागांत पहाटेच्या किमान तापमानात फारशी वाढ झालेली नाही. अलिबाग येथे २७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, ते सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. अलिबाग वगळता राज्याच्या अधिकांश भागांत रात्रीच्या उकाड्याची तीव्रता तुलनेने कमी आहे. नाशिकचे किमान तापमान सातत्याने सरासरी २० ते २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news