नाशिक | लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ३०५ नळ कनेक्शनधारकांना नोटिसा, पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

file photo
file photo
Published on
Updated on

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

घरपट्टी पाठोपाठ पाणीपट्टी वसुलीकडे देखील महापालिकेच्या कर विभागाने लक्ष केंद्रीत केले असून एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ३०५ नळकनेक्शनधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास थकबाकीदाराचा पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे.

संबधित बातम्या :

जीएसटीतून मिळणाऱ्या अनुदानाखालोखाल घरपट्टी, पाणीपट्टी वसुली हे महापालिकेच्या उत्पन्नातील प्रमुख साधन आहे. घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सवलत योजना राबविली. त्यानंतर थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम उघडली. त्यामुळे निर्धारीत उद्दीष्टाच्या जवळपास निम्मी वसुली गेल्या पाच महिन्यांतच झाली आहे. आता पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीकडे करवसुली विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. नाशिक शहरात २ लाख ६ हजार नळकनेक्शनधारक आहेत. या नळकनेक्शनधारकांना पाणीपट्टीचे नियमित देयकच अदा होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांनी पाणीपट्टीच्या देयक वाटपाचे नियोजन केले. आतापर्यंत १ लाख २१ हजार ६४६ नळ कनेक्शनधारकांना पाणीपट्टीची देयक वितरीत करण्यात आली आहेत. तर उर्वरीत ८४ हजार ९८१ देयकांच्या वाटपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एकीकडे पाणीपट्टीच्या देयकांचे वाटप केले जात असताना दुसरीकडे वर्षानुवर्षे पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नळकनेक्शन धारकांवरही महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. यासाठी थकबाकीच्या रकमेनुसार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात १३ कोटींची वसुली

पाणीपट्टीच्या थकबाकीदारांविरोधातील कारवाईच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक लाखापेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत असलेल्या ३०५ नळकनेक्शन धारकांची यादी तयार करण्यात आली असून या नळकनेक्शनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ३०५ थकबाकीदारांकडे १३ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

तर गुन्हा दाखल होणार!

महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर पंधरा दिवसात संबंधितांकडून थकबाकीची रक्कम महापालिकेकडे जमा होणे आवश्यक आहे. या मुदतीत थकबाकी न भरणाऱ्यांचा पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे. संबंधितांनी परस्पर पाणीपुरवठा जोडल्यास मात्र अशा नळकनेक्शनधारकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news