NEET UG 2026 Application Deadline | वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न धोक्यात? 'नीट'ची अधिकृत वेबसाईट दिवसभर ठप्प; विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

NEET UG 2026 Application Deadline | वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू असताना गुरुवारी दिवसभर अधिकृत वेबसाईट बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
NEET exam
‘नीट’ची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू असताना गुरुवारी दिवसभर अधिकृत वेबसाईट बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

NEET exam
Nashik Grape Export Crisis | युद्ध इराण-अमेरिकेचे, पण नाशिकचा द्राक्ष उत्पादक कोलमडला! अडीच हजार कोटींचा माल समुद्रात अडकला

अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाहीत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

नीट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ मार्च निश्चित करण्यात आली आहे. सध्या राज्यभरातून हजारो विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी या परीक्षेचा अर्ज भरत आहेत. मात्र, गुरुवारी (दि. ५) दिवसभर संबंधित वेबसाईट तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही.

NEET exam
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपाची तिजोरी फुल्ली! घरपट्टी वसुलीने ओलांडला 262 कोटींचा टप्पा; अभय योजनेचा 'धडाका'

काही विद्यार्थ्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही वेबसाईट उघडत नसल्याने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. अनेक विद्यार्थी शेवटच्या काही दिवसांत अर्ज भरत असल्याने अचानक वेबसाईट बंद पडल्याने त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला. काही विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे तसेच ऑनलाइन सेवा केंद्रांमध्ये जाऊनही अर्ज भरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वेबसाईट कार्यरत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पालकांच्या मते, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरळीत राहणे आवश्यक आहे. वेबसाईट बंद राहिल्यामुळे शेकडो विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news