Nashik Grape Export Crisis | युद्ध इराण-अमेरिकेचे, पण नाशिकचा द्राक्ष उत्पादक कोलमडला! अडीच हजार कोटींचा माल समुद्रात अडकला

Nashik Grape Export Crisis | कोल्ड स्टोअरेज द्राक्षमालाने फुल, निर्यातदारांकडून मलेशिया इंडोनेशियाच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित
Grape Export News
Grape Export NewsPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सहाव्या इराण-अमेरिका युद्धाची व्याप्ती दिवशी वाढली असून, इराणलगतच्या हॉर्मुझ खाडी आणि पर्शियन आखातात गेल्या सहा दिवसांपासून तब्बल ३,२०० मालवाहू जहाज अडकून पडले आहेत. त्यात नाशिकसह महाराष्ट्रातून द्राक्ष, केळी, कांदा, तांदूळ तसेच भाजीपाला घेऊन निघालेली सुमारे ७० ते ८० मालवाहू जहाजे आहेत.

Grape Export News
7000 year old skeletons | सहारा वाळवंटात 7,000 वर्षांपूर्वीचे अनोखे डीएनए असलेले सांगाडे

या जहाजांतील विविध शेतमालाचे मूल्य सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या आसपास असून, युद्धामुळे निर्यातदारांची कमाई धोक्यात आली आहे. नुकसान टाळण्यासाठी उरण जेएनपीटीतून दोन दिवसांत सुमारे ४५० कंटेनर नाशिकला माघारी आले आहेत. त्यातील काही माल मलेशिया, इंडोनेशियाला पाठविण्याची चाचपणी निर्यातदारांनी सुरू केली आहे.

इराण युद्धामुळे जेएनपीटी बंदराबाहेर अडकून पडलेले द्राक्ष कंटेनर निर्यातदारांनी माघारी बोलावून घेतले आहेत. कंटेनरला दररोजचे पाच हजार रुपये भाडे द्यावे लागत असल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी निर्यातदारांनी कंटेनर बोलावून त्यातील निम्मा माल स्थानिक बाजारपेठेकडे पाठविण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी स्थानिक बाजारपेठेत ११० द्राक्षाचा किलोचा दर ८० ते ९० रुपयांवर आला आहे. उरण ते नाशिकच्या वाहतूक भाड्यापोटी प्रत्येक कंटेनरसाठी ४० हजार रुपयांचा खर्चही काही निर्यातदारांनी सोसला आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे ४५० कंटेनर नाशिकला माघारी आल्याची माहिती सहारा एक्स्पोर्टसचे विलास जीवरक यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिली.

जिल्ह्यात सुमारे २०० कोल्ड स्टोअरेज आहेत. प्रत्येक कोल्ड स्टोअरेजमध्ये सुमारे १० ते १२ कंटेनर एवढा माल सध्या साठविलेला आहे. एका कंटेनरमध्ये १२ ते १५ टन माल बसतो. आजच्या घडीला नाशिक जिल्ह्यात निर्यातीचा सुमारे ३६ हजार टन द्राक्षमाल कोल्ड स्टोअरेजमध्ये अडकून पडलेला आहे. त्यातील निम्मा माल मलेशिया, इंडोनेशिया या राष्ट्रांना पाठविण्याची तयारी निर्यातदारांनी सुरू केली आहे. मलेशिया, इंडोनेशियात रमजानमुळे नाशिकची द्राक्षे विक्री करण्यासाठी कोल्ड स्टोअरेज मालकांनी निर्यातदार एजंटांशी बोलणी सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत किमान १०० कंटेनर माल तिकडे निर्यात होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास इराण युद्धामुळे होणारे नुकसान भरून निघण्याची आशा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरात घसरण : इराण युद्धामुळे द्राक्षांच्या दरावर तत्काळ परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्षांचे दर २० ते ३० रुपयांनी घसरले आहे. आखातात द्राक्षांचे दर ११० ते १२० रुपयांच्या दरम्यान होते. ते ७० ते ९० रुपयांवर आले आहेत, तर युरोपात १६० ते १९० रुपयांवर असलेला दर १३० ते १४० रुपयांवर आला आहे. मालाची गुणवत्ता घसरण्याच्या भीतीने हे दर उतरल्याची माहिती कोल्ड स्टोअरेजच्या मालकांनी दिली. ३० रुपयांनी दरात घसरण झाल्याने राज्यातील द्राक्ष निर्यातदारांना हा अतिरिक्त १०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. युरोपला आफ्रिकेमार्फत जाणाऱ्या मालासाठी जहाज वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे नर्यातदारांचे नफ्याचे गणित कोलमडले. फ्रीज कंटेनरला दररोज पाच हजार रुपये द्यावे लागतात. चार दिवसांत २० हजार रुपये अनेक निर्यातदारांनी मोजले आहेत. हे नुकसान सहन करणे शक्य नसल्याने गेल्या दोन दिवसांत उरण जेनपीटी बंदराबाहेरील ४५० कंटेनर माघारी आले आहेत.

विलास जीवरक, सहारा एक्स्पोर्ट्स

Grape Export News
7000 year old skeletons | सहारा वाळवंटात 7,000 वर्षांपूर्वीचे अनोखे डीएनए असलेले सांगाडे

व्याजाचा बोजा वाढणार

द्राक्ष निर्यातीच्या हंगामापूर्वी निर्यातदारांना बँकेचे कर्ज, खासगी माध्यमातून निधी उभारावा लागतो. निर्यातदारांनी द्राक्षबागांशी सौदे केलेले असून, उचललेल्या मालाचे पैसे तत्काळ द्यावे लागतात. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातून डॉलरच्या रूपाने मिळणारा पैसाच बंद झाल्यामुळे द्राक्ष निर्यातदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. २०२३-२४ च्या हंगामात द्राक्ष निर्यातदारांनी ३२ हजार मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात करत २८५ कोटी रुपयांचे विदेशी चलन मिळवले होते. आखातातील युद्ध लांबल्यास निम्माच निधी मिळण्याची भीती आहे. ट्रम्प यांच्या नीतीमुळे नाशिक जिल्ह्यातील २०० कोटींचे विदेशी चलनाचे द्राक्ष निर्यातीचे अर्थचक्र थांबले आहे.

370 कंटेनर दुबईत अडकले

दुबईला आधीच पोहोचलेले सुमारे ३७० कंटेनर तिथेच अडकले आहेत. तिथल्या बाजारपेठा सध्या बंद आहेत. जहाजातील माल उतरविला जात नाही. माल पाठविण्यास उशीर होत असल्याने निर्यातदारांना प्रतिकंटेनर दररोज सुमारे ८,५०० रुपये खर्च सोसावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news