Women Nashik TCS Case | राष्ट्रीय महिला आयोगाकडून पीडित महिलांचे जबाब सुरु

Women Nashik TCS Case | टीसीएस प्रकरण : चार सदस्यीय समितीकडून चौकशी
Triple talaq Case
Triple talaq Case: सातारारोड येथे पतीकडून तिहेरी तलाक; पीडित महिलेची तक्रारPudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टीसीएसमधील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चारसदस्यीय समिती शनिवारी (दि. १८) नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड पोलिस ठाणे परिसरातील कार्यालयात समितीकडून सुनावणी घेत पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

Triple talaq Case
TCS Nashik Case: धार्मिक परिवर्तन, लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या नाहीत; ‘टीसीएस‌’चा दावा

पढील दोन दिवस समितीचा मुक्काम नाशिकमध्ये राहणार आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश श्रद्धा जाधव, हरियाणाचे माजी पोलिस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील मोनिका अरोरा आणि आयोगाच्या समन्वयक लिलाबती यांचा समावेश आहे.

सकाळी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत समितीने उपलब्ध कागदपत्रांचा बारकाईने आढावा घेतला तसेच विशेष तपास पथक अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कडेकोट गोपनीयता राखण्यात आली. बैठक सुरू असताना कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात ठेवण्यात आला होता.

Triple talaq Case
Nashik Dangerous Buildings Notice | नाशिकमध्ये 1,181 धोकादायक वाड्यांना मनपाचा अल्टिमेटम

सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित महिला, त्यांचे कुटुंबीय, साक्षीदार तसेच संबंधित व्यक्तींचे सविस्तर जबाब नोंदविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत गोपनीयता आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.

निदा खानच्या शोधासाठी तीन पथके

या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तिच्या वतीने अॅड. बाबा सय्यद यांनी नाशिकरोड न्यायालयात अर्ज सादर केला असून, त्यावर सोमवारी (दि. २०) सुनावणी होणार आहे. अर्जात ती गर्भवती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतरपासून फरार असलेल्या निदा खानच्या शोधासाठी एसआयटीची तीन पथके कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news