Nashik Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा निधी वाटपा मध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांवर अन्यायाची भावना

Nashik Kumbh Mela | ओझर-शिर्डी २१० कोटींचा मार्ग प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela
Published on: 
Updated on: 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी कोट्यवधींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळत असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील महत्त्वाची कामे रखडल्याचे चित्र आहे. निधी वाटपातील या 'कथित' दुजाभावामुळे महायुतीअंतर्गत राजकीय असंतोलाची चर्चा सुरू झाली आहे.

Nashik Kumbh Mela
Sinnar Ration Card eKYC | सिन्नर तालुक्यात ई-केवायसीअभावी 23 हजार 501 लाभार्थ्यांचे रेशन आले धोक्यात

नाशिकमधील ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ हा सुमारे २१० कोटी रुपये खर्चाचा आणि १० मीटर रुंदीचा प्रस्तावित रस्ता याचे महत्त्वाचे उदाहरण ठरतो. हा मार्ग निफाडचे आमदार दिलीप बनकर, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघातून जातो. त्यामुळे तीन मतदारसंघातील हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

कुंभमेळ्यासाठी शिर्डी, मराठवाडा आणि विदर्भाकडून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. मात्र, सुमारे २१० कोटींच्या या प्रस्तावाला अद्याप अपेक्षित मंजुरी मिळालेली नाही. तीन आमदारांच्या मतदारसंघाना लाभदायक ठरणार हा प्रकल्प रखडल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विकासकामांना निधी मिळवण्यात अडचणी येत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी निधी मिळत नसल्याबाबत पक्षनेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. आता मंजूर कामांचे तपशील समोर आल्याने या नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

भाजप आमदारांना रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी

दूसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील चार रस्त्यांसाठी ५८.६० कोटी, तर चांदवड-लासलगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ७५.८२ कोटींस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. चांदवड मतदारसंघात भाजप आमदार राहुल आहेर आहेत. या कामांचा कुंभमेळ्याशी थेट संबंध दिसत नसल्याने निधी वाटपाच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Nashik Kumbh Mela
Dengue Outbreak | सिन्नर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक तीव्र; एका महिन्यात 11 नवीन रुग्णांची नोंद

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

सत्तेत सहभाग असूनही राष्ट्रवादीच्या आमदारांना विकासकामांसाठी संघर्ष करावा लागत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ओझर-शिर्डी मार्गाला मंजुरी कधी मिळणार आणि निधी वाटपाचे निकष काय असणार, याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणात दुजाभाव झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी महायुतीतील अंतर्गत समन्वयाची परीक्षा या निमित्ताने होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.