Fraud Case Nashik | बनावट डिजिटल सही प्रकरणी तरुणाची कारागृहात रवानगी

Fraud Case Nashik | या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, बनावट सहीच्या आधारे फसवणूक करणाऱ्या संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडिया व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला.
Beed Crime News
प्रदीप फाटे याची कारागृहात रवानगीFile Photo
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

विभागीय महसूल आयुक्तांच्या बनावट डिजिटल सहीच्या वापरातून आर्थिक गैरव्यवहार करत शासनाची दिशाभूल करणाऱ्या तरुणाला नाशिकरोड पोलिसांनी अभिषेक संजय झरे (२३, रा. ऐरोली, नवी मुंबई) यास अटक करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Beed Crime News
Nashik -गोदाप्रदूषण रोखण्यासाठी 13 वर्षांनंतर पोलिस पथक

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, बनावट सहीच्या आधारे फसवणूक करणाऱ्या संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडिया व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे व सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान ठावठिकाणा नवी मुंबईतील ऐरोली परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर, समाधान वाजे व अजय देशमुख यांच्या पथकाला तातडीने रवाना करण्यात आले.

Beed Crime News
Girish Mahajan Nashik | पुण्यापेक्षाही आता नाशिकला पहिली पसंती! विकासाच्या ओढीमुळे नाशिक बनले गुंतवणुकीचे केंद्र

फेसबुकवर स्थानिक नगरसेवकाशी आरोपीचा आरोपीचा फोटो आढळून आल्याने त्या नगरसेवकाची चौकशी करण्यात आली. आरोपी काही योजनासंदर्भात त्यांच्याशी संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी नगरसेवकाच्या माध्यमातून आरोपीला भेटीस बोलावले. ठरलेल्या ठिकाणी अभिषेक झरे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला चपळाईने ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी (दि. ४) त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news