ZP School Free Uniform | अडीच लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश!

ZP School Free Uniform | समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी १४.६७ कोटींचा निधी मंजूर
अडीच लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश!
अडीच लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी वाट पाहावी लागणार नाही. समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत खरेदी करून देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

अडीच लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश!
US attack on Iran: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! होर्मुझ समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या नौका आणि क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त

नाशिक जिल्ह्यातील तब्बल २ लाख ४४ हजार ५१० विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार असून, त्यासाठी १४ कोटी ६७ लाख ४८ हजार रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिल्याच दिवशी शालेय वर्षासाठी दोन गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत खरेदी करून देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील २ लाख ४४ हजार ५१० विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून, त्यासाठी १४ कोटी ६७ लाख ४८ हजार ६००० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील ५ कोटी ६७ कोटी ६० हजार ७२० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

हा निधी तालुकास्तरावर वाटप केला जात आहे. यंदा प्रत्येक विद्यार्थ्यांस दोन गणवेशासाठी प्रती ६०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शालेय व्यवस्थापन समितीकडे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात गणवेशाची रक्कम सुपूर्द करून गणवेश खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यात १ लाख २१ हजार ११३ मुली व १ लाख २३ हजार ३९७मुलांचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी व गणवेश योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण जाधव यांनी दिली. शिक्षण विभागाला गणवेश संदर्भातील शासन आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ७ हजार ५८४ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले, ८ हजार ५८७ अनुसूचित जाती व ७ हजार ५४८ अनुसूचित जमातीतील मुले व ३१ हजार ३ इतर मुले व २ लाख २१ हजार ११३ सर्व मुली यांचा समावेश आहे.

अडीच लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश!
Air India Flights Cancelled | गोव्याच्या पर्यटनाला विमान कंपन्यांचा मोठा धक्का! जूनच्या वेळापत्रकातून एअर इंडियाच्या अनेक फेऱ्या रद्द

मंजूर झालेल्या एकूण निधीपैकी पहिल्या टप्प्यात ५ कोटी ६७ लाख ६० हजार ७२० रुपयांचा निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला असून, तो तातडीने तालुकास्तरावर वाटप केला जात आहे. शालेय गणवेश खरेदीप्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी आरटीजीएस आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्ह्यातील १५ ही तालुक्यांना हा निधी वर्ग केला जात आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. शाळांना सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर दोन गणवेश खरेदीसाठी निधी वर्ग करण्यात येईल, त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेशवाटप करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

- साईलता सामलेटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news