Air India Flights Cancelled | गोव्याच्या पर्यटनाला विमान कंपन्यांचा मोठा धक्का! जूनच्या वेळापत्रकातून एअर इंडियाच्या अनेक फेऱ्या रद्द

Air India Flights Cancelled | राज्याच्या हवाई कनेक्टिव्हिटीला एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या नव्या नेटवर्क पुनर्रचनेमुळे मोठा धक्का बसला आहे.
Air India International Flight Cancellation
एअर इंडियाने जून ते जुलै दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या हवाई कनेक्टिव्हिटीला एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या नव्या नेटवर्क पुनर्रचनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या विमान कंपन्यांनी आपल्या जूनच्या वेळापत्रकात बदल करत गोव्यातील दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सेवा लक्षणीयरीत्या कमी केल्या आहेत.

Air India International Flight Cancellation
Pernem Goa Beach Shacks | रॉक गुंडाळले; खासगी रेस्टॉरंट सुरूच

विशेषतः अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबई-गोवा दाबोली मार्गावरील १३ साप्ताहिक फेऱ्या एअर इंडियाने रद्द केल्या आहेत, तर दिल्ली-मोप मार्गावरील एका सेवेला पूर्णपणे कात्री लावली आहे. याशिवाय, एअर इंडिया एक्सप्रेसने दिल्ली-मोप दरम्यानच्या साप्ताहिक फेऱ्या २१ वरून १४ वर आणल्या आहेत, तसेच हैदराबाद-गोवा दरम्यानच्या फेऱ्या वाढवण्याचा आधीचा बेत रद्द केला आहे.

Air India International Flight Cancellation
Chorla Ghat Checkpost | चोर्ला घाटात कर्नाटक अबकारी नाक्यावर प्रवाशांची लूट! मद्याच्या नावाखाली 'हप्ता' वसुलीचा खळबळजनक आरोप

विमान कंपन्यांनी या कपातीसाठी हवाई इंधनाच्या वाढत्या किमती, पश्चिम आशियातील संकटामुळे लांबलेले हवाई मार्ग आणि अंतर्गत पुनर्रचना या गोष्टी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंडिगोनेही सुरत, बडोदा, राजकोट, भुवनेश्वर आणि चंदीगड या शहरांमधून गोव्यासाठी चालणाऱ्या ३२ साप्ताहिक फेऱ्या बंद केल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news