ZP Primary Education | जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी सक्तीच्या रजेवर

ZP Primary Education | अंशतः बदल्या भोल्याची चर्चा : सीईओ ओमकार पवार यांचा दणका
ZP Primary Education
ZP Primary Educationfile photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत अंशकालीन बदलांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मागणी केल्याची कथित ऑडिओ क्लिप तसेच बदलांमधील वाढत्या तक्रारी प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना भोल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी शिक्षणाधिकारी सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच विभागाने केलेल्या ४२ अंशतः बदलांची चौकशी करण्याचे आदेशही पवार यांनी दिले आहेत.

ZP Primary Education
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाढले मतभेद

या प्रकरणामुळे शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा ऐरणीवर आला आहे. गत महिन्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांना नियुक्ती देण्यात आल्या. या नियुक्तीनंतर काही शिक्षकांनी अंशतः बदलीची मागणी होऊ लागली. मात्र, ओमकार पवार यांनी अंशतः बदलीस नकार दिला. एकही बदली करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, लोकप्रतिनिधींचा वारंवार येणारा दबाव आणि शिक्षकांच्या वाढत्या अडचणींचे पत्र लक्षात घेऊन पवार यांनी शिक्षकांचे अंशतः बदली प्रक्रिया केली. याच प्रक्रियेत इच्छित ठिकाणी बदली मिळवून देण्यासाठी नांदगावच्या विस्तार अधिकाऱ्याने एक लाख रुपयांची मागणी केल्याची क्लिप व्हायरल झाली.

ही व्हायरल झालेली क्लिप थेट मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्यापर्यंत पोहोचली. याची गंभीर दखल घेत, पवार यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली. या कारवाई पाठोपाठ पवार यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी सामलेटी यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

सुमारे ४२ शिक्षकांच्या अंशतः बदल्या करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे संबंधित बदल्याही संशायाच्या भोवण्यात सापडल्या आहेत. एका क्लिपमुळे कथित आर्थिक व्यवहाराचा मुद्दा समोर आल्याने अन्य बदलांमध्येही पैशांचे व्यवहार झाले होते का, असा प्रश्न होत आहे. त्यामुळे केवळ संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनापुरती कारवाई मर्यादित न ठेवता संपूर्ण बदली प्रक्रियेची चौकशी होण्याची मागणी झाली. त्यावर सर्वच बदलांची चौकशी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

ZP Primary Education
Trimbakeshwar Drought | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये 97 टक्के गावांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण

सामलेटी रजेवर जात असल्याने, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे पवार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

'माध्यमिक'चा पदभार रामदास बोडकेंकडे
सरोज जगताप यांच्याकडे आधी असलेला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार आता माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र रघुनाथ बोडके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बोडके हे प्रशांत दिग्रसकर रुजू होईपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार पाहणार आहेत.

शिक्षकांच्या अंशतः बदल करण्यासाठी जनप्रतिनिर्धीचा आग्रह होता. शिक्षकांच्या वैयक्तिक काही अडचणी होत्या. त्यावर अंशतः बदली प्रक्रिया राबविली. या बदलात काही तक्रारी पुढे आल्यानंतर विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन केले आहे. शिक्षणाधिकारी सामलेटी यांनी रजेचा अर्ज केल्याने त्यांची रजा मंजूर केली आहे.

— ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news