Nashik ZP Exam : जि. प. पदभरतीसाठी १५, १७ ऑक्टोबरला परीक्षा
नाशिक: पुढारी वृत्तसेवा; जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वायरमन, फिटर व पशुधन पर्यवेक्षक या सहा संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर १५ व १७ ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. (Nashik ZP Exam)
पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीची माहिती हे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य जिल्हा निवड समिती आशिमा मित्तल यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर ही माहीती उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Nashik ZP Exam)
हॉलतिकीट डाऊनलोड कुठून करावे
जिल्हा परिषद पदभरतीतील ६ संवर्गाच्या परीक्षा या १५ व १७ ऑक्टोबर रोजी होणार असून आयबिपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडीवर देखील हॉल तिकीटची लिंक पाठवण्यात आलेली आहे.
कुठल्या पदासाठी कधी होणार परीक्षा
दि.१५ ऑक्टोबर
१) कनिष्ठ लेखाधिकारी -१०१ परीक्षार्थी,
२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ९८ परीक्षार्थी
३) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ६५ परीक्षार्थी
दि.१७ ऑक्टोबर –
१) वायरमन – ३७ परीक्षार्थी
२) फिटर – ६ परीक्षार्थी
३) पशुधन पर्यवेक्षक – ७४७ परीक्षार्थी
हेही वाचा :

