Nashik zilla Parishad - जि.प.चे तीन अधिकारी लाच घेताना ताब्यात

बिल मंजुरीसाठी ठेकेदाराकडे मागितले सहा हजार रुपये
Zilla Parishad Nashik
Zilla Parishad Nashik
Published on
Updated on

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद (इवद) उपविभागात विकासकामांच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या तीन लोकसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले.

सहायक अभियंता सतीश दराडे (वय ४२), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सागर रावळे (वय ३५) आणि कनिष्ठ सहायक रवींद्र गायकवाड (वय २९) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार हे सुशिक्षित बेरोजगार अभियंता असून, त्यांनी ठेकेदारी परवाना घेतला आहे. त्यांनी १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) येथे सीमेंट रस्ता कॉक्रिटीकरणाची दोन कामे वेळेत पूर्ण केली होती.

या कामांचे सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी २ टक्के प्रमाणे ९ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ६ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली होती. तक्रारदाराने या मागणीविरोधात एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर २७ एप्रिल रोजी सापळा कारवाई करण्यात आली.

Zilla Parishad Nashik
MHADA Gharkul scam Nashik - अखेर २६ लेआउट रद्द; मनपाचा बिल्डरांना दणका

या कारवाईत सहायक अभियंता दराडे यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यांनी ही रक्कम काढून कनिष्ठ सहायक गायकवाड यांच्याकडे दिली. याच वेळी एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.

Zilla Parishad Nashik
Ashok Kharat | भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलिस कोठडी

ही कारवाई पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार संदीप वनवे, अविनाश पवार आणि पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिस अधीक्षक भारत तांगडे व अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news