Ashok Kharat | भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलिस कोठडी

सातव्या गुन्ह्याप्रकरणी कारवाई
Ashok Kharat
Ashok Kharat Casepudhari photo
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरातविरुद्ध दाखल सातव्या गुन्ह्यात न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पथकाने सहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने दोन्ही वाजूंचा युक्तिवाद ऐकून तीन दिवसांची कोठडी मंजूर केली. त्यामुळे खरातला आणखी काही काळ पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून, मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली तिची फसवणूक केली. पाण्यात गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Ashok Kharat
TCS Nashik Case | नाशिक टीसीएस प्रकरणाला 'टेरर' वळण! एसआयटी कोठडीत एटीएसची एन्ट्री; रझा अन् शफीची 4 तास चौकशी

तसेच हे प्रकरण उघड केल्यास दैवी शक्तीने मुलांना मारण्याची व कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. आरोपीने फिर्यादीवर चार वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद असून, तिचा पुरवणी जबाबही नोंदविण्यात आला आहे.

सखोल तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक

पोलिस कोठडीची मागणी करताना तपास पथकाने आरोपीचा हेतू, गुंगीकारक पदार्थाचा स्रोत तसेच इतर महिलांबाबतही अशाच प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत का आदी मुद्यांचा तपास आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले. घटनास्थळावरून हिराबाई सुदाम मुळाणे यांच्या नावाचे धनादेश तसेच अंगठ्यांचे मोजमाप घेण्याचे उपकरण जप्त करण्यात आले असून, त्याबाबतही चौकशी सुरू आहे.

Ashok Kharat
Nashik -भोंदू महेशगिरीच्या नातेवाईकांकडून लाचेचा प्रयत्न

तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी, आर्थिक व्यवहारांची छाननी आणि घटनास्थळाशी संबंधित इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news