Nashik Youth Congress Protest | एपस्टीन फाइल्स : युवक काँग्रेसचे आंदोलन

Nashik Youth Congress Protest | जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टीन फाइल्समध्ये केंद्र सरकारमधील मंत्र्यांचे नाव आल्याने, जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
nashik news
nashik news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टीन फाइल्समध्ये केंद्र सरकारमधील मंत्र्यांचे नाव आल्याने, जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन येथे दुपारी २ च्या सुमारास आंदोलन करण्यात आले.

nashik news
Sinhastha Kumbh Mela 2026 | सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला सुरक्षेस प्राधान्य द्या

जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात, 'जेफ्री एपस्टाइन कोण आहे?, एक हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणारा माणूस आहे.

जो करोडपती, अब्जाधीश लोकांना सेवा उपलब्ध करून देतो. लहान मुलांचे शोषण करतो. अशा व्यक्तीबरोबरच जर केंद्र सरकारमधील मंत्र्यांचे नाव जोडले जात असेल तर ते नक्कीच शोभनीय नाही.

nashik news
Nashik Politics | विलीनीकरणाची घाई का ?

त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन देशासमोर सत्य मांडावे अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. तसेच मंत्री हरदीप पुरी यांचा राजीनामा घ्यावा, अशीही मागणी केली गेली.

यावेळी युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल पाटील, सरचिटणीस राहुल मोरे, जिल्हा सचिव हर्षल देशमुख, सौरभ पगारे, निफाड विधानसभाध्यक्ष सचिन खडताळे, येवला विधानसभाध्यक्ष अक्षय शिंदे, इगतपुरी अध्यक्ष गणेश मेधने, देवळाली विधानसभाध्यक्ष हेमंत पवार, ओझर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कृष्णा सोनवणे, प्रशांत बोलणीस, तौसिफ राजे, हिरेन फोडल आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news