Nashik Politics | विलीनीकरणाची घाई का ?

Nashik Politics | मंत्री छगन भुजबळ : सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष होणार
Chhagan Bhujbal news
Chhagan Bhujbal news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची रोज चर्चा रंगत आहे. विलीनीकरण आजही करता येईल अन् दोन महिन्यांनीही करता येईल. एवढी घाई करण्याचे कारण काय? सुनेत्राताई उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांचीच निवड केली जाणार आहे. त्यानंतर पक्षाचे प्रमुख लोक बसून चर्चा करतील.

Chhagan Bhujbal news
Subhash Velingkar Ponda | मराठीपुढे पोतुगीजांनीही पत्करली होती शरणागती

शेवटी एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांनी चर्चा करूनच होईल. त्याच्याविषयी एवढी घाई करण्याचे कारण नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा रंगत आहेत. आ. हिरामण खोसकर यांनी, विलीनीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले आहे. याबाबत माध्यमाशी बोलताना मंत्री भुजबळ यांनी विलीनीकरणाची चर्चा थांबवा, असे स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, काही नेते म्हणत आहेत की, आधी ठरले होते, ते झालेच पाहिजे. मात्र, आता असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

नवीन कॅप्टन आले आहेत. त्यांना बसू द्या, समजू द्या. नंतर काय करायचे ते बघतील. आज आमच्यासमोर खरोखरच हा विषय नाही. माझ्यासमोर सुनेत्राताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे ठरले आहे. त्यानंतर त्या विचार करतील.

आमदारांची बैठक घेतील. सध्या या सर्व गोष्टींची घाई कशासाठी? सुनेत्राताई यांचा शपथविधी झाला, तेव्हा घाई केली म्हणून बोलत होते. मग पहिल्या दिवसापासून विलीनीकरणाची बातमी येत आहे ही घाई नाही काय? हे थांबवले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विलीनीकरणावर टार्गेट केले जात असल्याबाबत मंत्री भुजबळ यांना विचारले असता त्यांनी, पक्ष हा त्याचे सदस्य आणि कार्यकर्ते म्हणून चालत असतो. त्यामुळे अशा प्रकारे कोणी टार्गेट करीत असेल, तर ते चुकीचे आहे,

असे भुजबळ म्हणाले. तसेच खासदार शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यासाठी शिवसेना उबाठा पक्ष मदत करीत असल्याबाबत विचारले असता, तो महाविकास आघाडीचा प्रश्न असल्याचे भुजबळांनी म्हटले.

Chhagan Bhujbal news
Yuri Alemao Cuncolim | 2027 मध्ये काँग्रेसच येणार सत्तेत

अर्थ खाते राष्ट्रवादीकडेच ?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदी बसू द्या. अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे निम्मे काम केले असून, पुढचे काम मी स्वतः करतो. त्यानंतर वित्त खात्याबाबत निर्णय घेऊ. त्यामुळे अर्थ खाते राष्ट्रवादीकडेच राहणार, या चर्चेलाही भुजबळ यांनी दुजोरा दिला

खोसकर हे मोदी, शहा यांना भेटले असावेत

विलीनीकरणासाठी आमदार हिरामण खोसकर आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्ली वारी केली. याबाबत मंत्री भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले असतील, असे म्हणत त्यांच्या विलीनीकरणाच्या प्रयत्नांना काही अर्थ नसल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news