Sinhastha Kumbh Mela 2026 | सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला सुरक्षेस प्राधान्य द्या

Sinhastha Kumbh Mela 2026 | नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश विदेशातून महिला भाविक येतील.
Simhastha Kumbh Mela Nashik
Janori Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश विदेशातून महिला भाविक येतील. या महिलांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिल्या. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गोन्हे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १४) सकाळी नाशिक विभागाची बैठक झाली.

Simhastha Kumbh Mela Nashik
Subhash Velingkar Ponda | मराठीपुढे पोतुगीजांनीही पत्करली होती शरणागती

त्यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे), महेश्वर रेड्डी (जळगाव), श्रवण दत्त (नंदुरबार), अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे (अहिल्यानगर) हे दूरदृश्य संवाद प्रणाली माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. उपसभापती डॉ. गोहे म्हणाल्या की, सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील.

या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृहांची सुविधा असावी. तसेच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही उपसभापती डॉ. गो-हे यांनी सांगितले. महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुकास्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात.

ज्या तालुक्यांमध्ये भरोसा सेल नसेल, तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमित बैठका घ्याव्यात. पती पत्नीत समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी.

अमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे. रेल्वे प्रवासात महिलांशी निगडित काही अप्रिय घटना घडू नये. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे व पोलिस दलाने नियमित संवाद साधावा.

दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्या बैठकांमध्ये महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा, शालेय बसची तपासणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोष सिद्धीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Politics | विलीनीकरणाची घाई का ?

विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांनी सांगितले की, विभागातील पाचही जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिस दलाच्या माध्यमातून विविध उपाययोजन करण्यात येत आहेत. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी कारवाई करून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिस अधीक्षक धिवरे, दत्त, रेड्डी, मिरखेलकर, कलबुर्गी, चव्हाण यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news