नाशिक : का लागते रस्त्यांची 'वाट'! काँक्रिटीकरण रस्त्याला 20 वर्षे आयुष्य

नाशिक- मुंबई महामार्गावर काम : काँक्रिटीकरणाचा रस्ता करतात तरी कसा?
का लागते रस्त्यांची 'वाट'!
का लागते रस्त्यांची 'वाट'!pudhari news network
Published on
Updated on
नाशिक : दिलीप सूर्यवंशी

पावळ्यात होणाऱ्या डांबरी रस्त्यांच्या दुर्देशेवर शासनाने काँक्रीट रस्त्याची मात्रा आणली आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक-मुंबई महामार्गांच्या काँक्रीट रस्त्याचे काम शासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, सध्या आडगाव ते इंदिरानगर आणि गोंदे ते आंबेदुमाला या दरम्यान हे काम सुरू आहे. सुमारे 20 वर्षे लाइफ असलेला हा रस्ता कसा तयार होतो, या अनुषंगाने घेतलेला आढावा...

सिमेंट काँक्रिटीकरण कसे करतात

रस्ता तयार करताना सबग्रेड, जीएसबी, डीएलसी, पीकेसी अशा चार थरांद्वारे तयार होतो. सर्वात खालचा थर सबग्रेड असून, यामध्ये माती, वाळू, खडी आणि स्टॅबिलायझिंगचा वापर केला जातो. हा साधारण 500 एमएमचा असतो. दुसरा थर जीएसबीचा असतो. हा 200 एमएमचा असतो. यामध्ये दगडांचे तुकडे, खडी, वाळू वापरली जाते. तिसरा थर डीएलसीचा असतो. त्यात सिमेंट, खडी आणि वाळू वापरली जाते. हा कोरडा थर असतो. डीएलसीमुळे जीएसबी आणि पीक्यूसी थरांमध्ये अंतर राहाते. सर्वात वरचा पीक्यूसी थर असतो. यात सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी समप्रमाणात मिक्स करून काँक्रीट तयार केले जाते. त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पीक्यूसी थर पेव्हर मशीनने घट्ट केला जातो.

का लागते रस्त्यांची 'वाट'!
नाशिक : का लागते रस्त्यांची 'वाट'! कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ते खड्ड्यात

रस्ता दुरवस्थेची कारणे

रस्त्यांवरून जाणार्‍या वाहनांची संख्या अन् वाहनांचे वजन, दोन्ही बाजूने उतार न दिल्यास खड्डे पडतात. रस्ता खोदताना मातीच्या थराचे परीक्षण न करणे, छोट्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोठे खड्डे होतात. वाहनांच्या क्षमतेचा विचार न करता रस्ता करणे, रस्ता खोदताना काढलेली माती पुन्हा रस्त्यावर टाकणे. जलवाहिनी, ड्रेनेजलाइनसाठी जागा न ठेवल्यास पाणी रस्त्यात मुरते.

नाशिक - मुंबई रस्त्यावर वारंवार पडणारे खड्डे आणि त्यातून वाहनधारकांची गैरसोय व तिजोरीवर पडणारा भार या सगळ्या बाबींसाठी सिमेंट रस्ता प्रभावी ठरणार आहे. हा रस्ता मजबूत, टिकाऊ आणि जास्त वाहनभार क्षमता वाहून नेणारा असेल. याचे आयुष्य 20 वर्षे असेल.

दिलीप पाटील, तांत्रिक प्रबंधक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

का लागते रस्त्यांची 'वाट'!
नाशिक : का लागते रस्त्यांची 'वाट'! खड्डेमुक्ती उदिष्ट गाठण्याबाबत अजूनही प्रतिक्षाच !

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news