Nashik Monsoon Delay | 'पावसाची हुलकावणी, उकाड्यात वाढ'

Nashik Monsoon Delay | अर्धा जून महिना संपूनदेखील पाऊस पडत नसल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे सूर्याचा प्रकोप कायम असल्याने, नाशिककरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
Dharashiv Rain
धाराशिव जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री!pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अर्धा जून महिना संपूनदेखील पाऊस पडत नसल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे सूर्याचा प्रकोप कायम असल्याने, नाशिककरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले जात असल्याने रात्री व पहाटेच्या सुमारास जाणवणारा उकाडा असह्य करणारा ठरत आहे.

Dharashiv Rain
Solapur Weather: पाऊस पडूनही उकाडा कायम

गेल्या २ जूनला मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने, पुन्हा सरी बरसतील अशी अपेक्षा होती.

मात्र, पावसाने तेव्हापासून हुलकावणी दिल्याने अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा नाशिकचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे यंदाचा उन्हाळा नाशिककरांसाठी चांगलाच 'ताप'दायक ठरला आहे.

Dharashiv Rain
Nashik Weather Forecast | तापमानात वाढ; उकाड्याने नाशिककर त्रस्त

सध्या नाशिकचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात असले तरी, किमान तापमानातील वाढ तीव्र उन्हाळ्याची जाणीव करून देणारी ठरत आहे. हवामान विभागाने अगोदरच यंदा उन्हाची तीव्रता जून महिन्यातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिककरांना आणखी काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news