Solapur Weather: पाऊस पडूनही उकाडा कायम

१३.१ मिमी पावसाची नोंद, मोठ्या पावसाची प्रतीक्षा
Solapur Weather
Solapur WeatherFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्‍ह्यात मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत विजांच्या कडकटात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाकडे १३.१ मिमीमीटर पावसाची नोंद झाली असून, पाऊस पडूनही उकाडा कायम होता. ३ जून रोजी तापमानात किंचित घट होऊन ३७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्‍या. परंतु तापमान मात्र ४० अंशाखाली येत नव्हते. त्यामुळे उष्णतेच्या झळाबरोबरच तापमानही कायम होते. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका होताना दिसत नाही. बुधवारी दिवसभर जोरदार वारे वाहत असतानाही हवेत असलेल्या आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता कायम राहिली.

सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी होती. दुपारच्या सुमारास पुन्हा ऊन पडले. वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिक घामाघूम झाले होते. जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी धूळ उडाल्याचे चित्र दिसून आले. शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करत असून खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. हवामानातील सततच्या बदलामुळे नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास कमी होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पाऊस आणि उष्णतेच्या या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news