Nashik Weather Forecast | तापमानात वाढ; उकाड्याने नाशिककर त्रस्त

Nashik Weather Forecast | किमान पारा २५ अंश सेल्सिअसच्या आसपास
Jalna weather update
हुश्श..! 44 दिवसांनंतर पुण्याचा पारा 36 अंशांवर; कमाल तापमानात 6 ते 8 अंशांनी घटFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असल्याने, उकाड्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. किमान तापमान सातत्याने २५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले जात असल्याने, रात्री आणि पहाटेच्या सुमारास प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. गुरुवारी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

Jalna weather update
Konkan Railway Monsoon Timetable | कोकण रेल्वेचा वेग मंदावणार !

30 -40- -20 -40 यंदाचा मे महिना नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक जात आहे. याच महिन्यात नाशिकच्या तापमानाने ४२ अंश सेल्सिअसचा स्तर गाठला असून, तीनदा तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेले आहे. दरम्यान, मागील आठवड्यापासून नाशिकचे तापमान ४० अंशांच्या खाली नोंदविले जात असून, दोन दिवसांपूर्वी तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

Jalna weather update
NHA Report 2026 | राज्याचा आरोग्य खर्च राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट

मात्र, आता पुन्हा एकदा तापमान चाळिशीकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. तर किमान तापमान सातत्याने २५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जात असल्याने, गर्मीन नाशिककर त्रस्त झाले आहेत. गुरुवारी किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दरम्यान, वाढत्या तापमापासून बचाव करण्यासाठी नाशिककरांना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news