Nashik- प्रभाग समित्यांची गुरुवारी निवडणूक

कार्यक्रम जाहीर : भाजपला मिळणार सर्वाधिक सभापतिपदे
election
election file photo
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतिपदासाठीचा निवडणूक अधिकारी तथा अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या गुरुवारी (दि.३०) निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. सहाही प्रभाग समित्यांत निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. सर्वाधिक सभापतिपदे भाजपकडे जाणार आहेत.

election
Nashik Farmers end of life | तीन महिन्यांत ८० शेतकऱ्यांनी जीवन संपवले

पंचवटी, सातपूर, पश्चिममध्ये भाजपकडे बहुमत आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक पार पडल्यानंतर प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक पूर्वच्या सभापतिपदाची निवडणूक सकाळी १० ते ११ दरम्यान होणार आहे. त्यानंतर नाशिक पश्चिम, पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड अशी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीवर भाजपचाच वरचष्मा राहणार आहे. तीन प्रभाग

Admin

समित्यांत भाजपकडे स्पष्ट बहुमत असून, तर उर्वरित तीन प्रभाग समित्यांत महायुतीचा सभापती असणार आहे. दरम्यान, प्रभाग समित्यांवरील सभापतींची निवड होणार असली तरी, विरोधी पक्षनेते, सभागृह नेतेपदाची घोषणा अद्याप बाकी आहे. तो अधिकार महापौर यांचा आहे. त्यामुळे नगरसचिव विभागाने प्रभाग समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेतेपदाचाही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

election
Nashik - धारणगाव खडक येथील भोंदू महेश काकडे अटकेत

भाजप, महायुतीकडे समित्या

पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपचे नगरसेवक. त्यामुळे येथे बहुमतावर भाजपचा सभापती.

सातपूर विभागात २० पैकी १४ भाजपचे नगरसेवक. त्यामुळे येथेही भाजपचा सभापती.

पश्चिम विभागात १२ पैकी ७ भाजपचे नगरसेवक असल्याने, येथेही भाजपचीच सत्ता असेल.

पूर्व विभागात १९ पैकी भाजपचे ९ नगरसेवक. शिवसेनेचे ४ नगरसेवक. त्यामुळे येथे महायुतीचा सभापती.

सिडकोत २४ पैकी भाजपचे १२ नगरसेवक, तर शिवसेनेचे ७ नगरसेवक. येथे महायुतीचा सभापती.

नाशिकरोड विभागात २४ पैकी शिवसेना (उबाठा) पक्षाचे १० नगरसेवक. भाजपचे ९ तर शिवसेनेचे ४ असे १३ नगरसेवक महायुतीकडे असल्याने येथेही महायुतीचा सभापती असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news