Nashik - धारणगाव खडक येथील भोंदू महेश काकडे अटकेत

धारणगाव खडक येथील भोंदू महेश काकडे अटकेत
Nashik - धारणगाव खडक येथील भोंदू महेश काकडे अटकेत
Published on
Updated on

लासलगाव : निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भाँद्बाबा महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडेला लासलगाव पोलिसांनी अटक केली. महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक शोषण तसेच जाट्टोणाविरोधी कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर सुमारे २४ तासांनी मध्यरात्री १.३० च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याला निफाड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश एस. एस. सुक्रे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता अॅड. मनोज तोरणे यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगत सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला २९ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.

दरम्यान, आरोपी महेश गिरीचा मठ धारणगाव खडक येथे असून, तेथे दर गुरुवारी दरबार भरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लासलगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news