Nashik Vegetable Price Hike | आवक 60 टक्क्यांनी घटली; खिशाला झळ, शेतकरीही संकटात

Nashik Vegetable Price Hike | आवक ६० टक्क्यांनी घटली; खिशाला झळ, शेतकरीही संकटात
Goa Vegetable Price Hike
Goa Vegetable Price Hike pudhari photo
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जूनचा अर्धा महिना संपूनही पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत असून त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. पाण्याअभावी उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी झाली असून, गेल्या दोन महिन्यांत भाजीपाल्याच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पूर्वी २० ते ३० रुपयांना मिळणारी भाजीची जुडी आता १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Goa Vegetable Price Hike
Pune Vegetable Market Rates: उन्हाळ्याचा फटका; पुण्यात भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीनुसार पालेभाज्यांच्या आवकमध्ये मोठी घट झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने दर वाढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत होते.

त्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून, पावसाअभावी उत्पादन कमी झाल्याने शेतमालाला चांगला भाव मिळत असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वाढला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दररोज २०० ते २५० वाहनांमधून भाजीपाला मुंबईसह विविध बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. मात्र यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे आवक कमी झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढली असून भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे.

Goa Vegetable Price Hike
Nashik Vegetable Price Hike | नाशिक बाजार समितीत कांदापातीने रचला इतिहास! प्रतिशेकडा 13 हजार 659 रुपयांचा विक्रमी भाव; आवक निम्म्यावर

व्यावसायिकांना फटका

अनेक गृहिणी पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात भाजीपाला घेत असून हॉटेल, खाणावळी आणि लहान व्यावसायिकांनाही वाढलेल्या दरांचा फटका बसत आहे. त्यात आताच धोंड्याचा महिना संपल्याने लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिक भाजीपाल्याची आवश्यकता वाढणार आहे. पाऊस वेळेवर झाल्यास पुढील काही आठवड्यांत आवक वाढून दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

असे आहे पालेभाज्यांचे दर

सध्या मेथी, पालक, शेपू आणि कोथिंबिरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नाशिक बाजार समितीत गावठी कोथिंबिरीच्या सुमारे ८७ हजार ७५० जुड्या दाखल झाल्या असून, सरासरी ७ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. हायब्रीड कोथिंबिरीच्या सुमारे ८ हजार ७८० जुड्यांना ६ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला. मेथीच्या ७ हजार ८०० जुड्यांची आवक झाली असून, तिलाही सात हजार रुपयांहून अधिक दर मिळाला. शेपूच्या सुमारे ६ हजार २०० जुड्यांना चांगला भाव मिळाला. तर कांदापात बाजारात दाखल झाली नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news