देवळा ; तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तिसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुलोचना राजेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच भिमाबाई ठाकरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी सरपंच पदाच्या निवडीसाठी गुरूवारी (दि. १२ ) सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी के.टी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी सुलोचना राजेंद्र जाधव यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
नवनिर्वाचित सरपंच सुलोचना अहिरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत अहिरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच उमाकांत आहेर, अरविंद आहेर, प्रविण आहेर, दिपक आहेर, माजी सरपंच भिमाबाई ठाकरे, भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष दादा जाधव, महेंद्र पाटील, ग्यानदेव निकम, बाबाजी जाधव, माणिक जाधव, गोरख आहेर, प्रल्हाद आहेर, योगेश आहेर, सोमनाथ जाधव , ग्रामसेविका अर्चना सोनार, तलाठी रोशन जाधव , कोतवाल राजेंद्र देवरे, शिपाई, भाऊसाहेब अहिरे, शरद आहिरे, नारायण वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.