Nashik Leopard News | वर्षभरात नाशिक वेशीवर ८३ बिबटे जेरबंद

मानवी वस्तीत वाढता संचार चिंताजनक, नैसर्गिक अधिवास जपण्याची जबाबदारी मानवावरच
Nashik Leopard News
वर्षभरात नाशिक वेशीवर ८३ बिबटे जेरबंदfile photo
Published on
Updated on
नाशिक : दिलीप सूर्यवंशी

अलीकडे नैसर्गिक अधिवास सोडून बिबट्याने मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येतेे. गेल्या वर्षभरात नाशिक पूर्वमध्ये 70, तर पश्चिममध्ये 13 बिबटे पकडण्यात आले. त्यांना साधारणत: 150 किलोमीटर अंतरावरील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तरीही बिबट्यांची पावले मानवी वस्तीकडे वळतच आहेत. तो मानवी वस्तीकडे का वळला, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी. मादी बिबट्या वर्षभरात दोन ते तीन पिलांना जन्म देते. साधारणत: वषर्भरात बिबट्या शिकारीसाठी प्रगल्भ होतो. मृत्युदरात घट झाल्याने त्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. साधारणत: नाशिकमध्ये 360, तर नगरमध्ये 985 बिबटे असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 3 वर्षांत 4,833 प्राण्यांची शिकार केली आहे. आपल्यापेक्षा लहान उंचीच्या प्राण्यांची उदा. कुत्रा, मांंजर, शेळी, लहान गुरे यांची तो शिकार करतो.

Nashik Leopard News
Nashik Leopard News | बिबट्याने आडवली शेतकऱ्याची वाट, वाढली धडधड

बिबट्याचे आकारमान

नर बिबट्या हा मादीपेक्षा 50 टक्के मोठा असतो. नर बिबट्याची उंची 4 फूट 2 इंच (127 सेमी), तर लांबी 4 फूट 8 इंच (142 सेमी) इंचांपर्यंत असू शकते. वजन 50 ते 77 किलोच्या दरम्यान असते. मादी बिबट्याची उंची 3 फूट 5 इंच (104 सेमी) तर लांबी 3 फूट 10 इंच (117 सेमी) पर्यंत असते.

वेग ताशी ५८ किमी

बिबट्या खरे तर माणसापासून दूरच राहणे पसंत करतो. हल्ला होण्याची भीतीने स्वत:च्या सुरक्षेसाठी तो माणसावर हल्ला करतो. साधारणत: 20 किलोमीटर परिसरात भक्ष्य शोधणारा बिबट्या ताशी 58 किमी वेगाने धावू शकतो, तर हवेत 6 मीटरपर्यंत उडी मारून भक्ष्य पकडतो. उडी मारताना त्याची वक्राकार शेपटी संतुलन राखण्यास मदत करते. अंधारात तो 7 पटीने अधिक चांगले पाहु शकतो.

रात्री सक्रिय राहणारा प्राणी

बिबट्या निशाचर प्राणी असल्याने तो रात्री सक्रिय असतो. दिवसा लपून राहणे अन पहाटे किंवा रात्री शिकार करणे हा त्याचा दिनक्रम असतो. त्याच्या शरीरावरील काळ्या डागांना रोझेटस म्हणतात. अनेक ठिकाणी काळे बिबटेही आढळतात. त्यांना ब्लॅक पँथर म्हणतात.

नैसर्गिक अधिवासात घट

शहरीकरणाच्या नावाखाली जंगले नष्ट होत असल्याने भक्ष्य आणि पाणवठे कमी होत असल्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत आहे. बिबट्या शिकार करत असलेल्या प्राण्यांची संख्याही कमी झाल्याने त्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. मानवी वस्तीच्या आसपास झाडे, शेतातील ऊस, बाजरी, मका, ज्वारी ही उंच पिके लपण्यास सुरक्षित असल्याने हाच त्याचा नैसर्गिक अधिवास झाला आहे.

Nashik Leopard News
Nashik Crime News | दामिनी पथकातील महिला पोलिसांनाच टवाळखोरांची धक्काबुक्की

शासकीय मदत

बिबट्याच्या हल्ल्यात माणसाला अपंगत्व आले, तर शासनाकडून 5 लाख अन मृत्यू झाल्यास 25 लाख नुकसानभरपाई दिली जाते. सन 2024 मध्ये नाशिक पूर्व आणि पश्चिममध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बालकासह सहा माणसे दगावली. त्यांना 1 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात आली, तर 10 जण जखमी झाल्याने त्यांना 14 लाखांची मदत करण्यात आली. सन 2024 मध्ये 1,452 पाळीव प्राण्यांची शिकार केल्याने 1 कोटी 92 लाखांची मदत देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news