Nashik Traffic Jam | सलग सुट्ट्यांनी त्र्यंबकेश्वरला वाहतूक कोंडी, शहराच्या प्रवेशद्वारी लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्यांनी त्र्यंबकेश्वरला वाहतूक कोंडी, शहराच्या प्रवेशद्वारी लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा
त्र्यंबकेश्वर : येथील मुख्य रस्त्यांवर झालेला वाहतुकीचा खोळंबा
त्र्यंबकेश्वर : येथील मुख्य रस्त्यांवर झालेला वाहतुकीचा खोळंबा
Published on: 
Updated on: 

त्र्यंबकेश्वर : येथे सलग शासकीय सुट्टया आल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा उडालेला गोंधळ पाहावयास मिळाला. शुक्रवारी (दि. २) सकाळपासून दिवसभर शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांच्या रांगा काही किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या.

नाशिक - त्र्यंबकेश्वर प्रवासाला १ तास आणि शासकीय विश्रामगृह ते शहरातील प्रवेश दीड तास तसेच शहराबाहेर पडताना शासकीय विश्रामगृहापर्यंत पोहोचण्यास पुन्हा दीड तास असा वेळ लागल्यामुळे भाविक, प्रवासी वैतागले होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवासदेखील रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामांनी अत्यंत संथ गतीने रडत खडत करावा लागल्यामुळे नको ते त्र्यंबकेश्वरी येणे असे भाविक मनोमन म्हणत होते.

येथे पूजा विधीसाठी आलेल्या भाविकांचे नियोजन वाहतूक कोंडीमुळे कोलमडले. स्थानिक नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागला. मुख्य रस्ता जव्हार फाटा ते नगर परिषद वाहनतळ हा मागील एक वर्षापासून खोदून ठेवला आहे. या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा रस्ता वारंवार रहदारीसाठी बंद करण्यात येतो.

गजानन महाराज चौक प्रवेश कमान ते नगर परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्याने बाहेरगावच्या वाहनांना प्रवेश देण्यात येत नाही. त्यातही या रस्त्यालगत खासगी बांधकाम सुरू आहे. त्या बांधकाम साहित्याची तसेच आरएमसी वाहतूक करणारी अवजड वाहने उभी राहिल्यामुळे वाहतूक खोळंबा होत आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील मुख्य रस्त्यांवर झालेला वाहतुकीचा खोळंबा
Nashik Municipal Corporation | नाशिककरांना मोठा दिलासा! मालमत्ता अन् पाणीपट्टी नाव बदलाच्या विलंब शुल्काला महापालिकेचा 'ब्रेक'

वाहनतळाकडे जाणारा रस्ता बंद असल्याने भाविक जव्हार रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून शहरात जात होते. त्यातही जागा उपलब्ध न झाल्यास पुन्हा नाशिकच्या दिशेने माघारी वळण घेत होते. या सर्वाचा एकत्रित परिणाम झाला आणि येथे दिवसभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. संत गजानन महाराज संस्थान असलेल्या त्रिफुलीवर स्थानिक पोलिसांच्या मदतीला सीआरपी दलाचे पोलिस तैनात केले होते. मात्र वाहतुकीचा झालेला खोळंबा टाळता आला नाही.

त्र्यंबकेश्वर : येथील मुख्य रस्त्यांवर झालेला वाहतुकीचा खोळंबा
Nashik infant baby dead body bike transport : दुचाकीवरून ६० किमी नेला बाळाचा मृतदेह! निर्दयी यंत्रणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news