Nashik Accident News
देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; २०० फूट दरीत ट्रॅक्टर कोसळून दोन ठार, ९ जखमी

Nashik Accident| देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; २०० फूट दरीत ट्रॅक्टर कोसळून दोन ठार, ९ जखमी

जातेगाव येथील पिनाकेश्वर घाटातील घटना
Published on

नांदगाव : पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन परतताना ट्रॅक्टर २०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.१७) नांदगाव तालुक्यातील जातेगावातील पिनाकेश्वर घाटात घडली. कांताबाई नारायण गायके (वय ५६), कमलबाई जगदाळे (वय ६२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे खामगाव गावावर शोककळा पसरली आहे.

Nashik Accident News
Palghar Accident News : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव एसटी बस झाडावर आदळली; सहा प्रवासी थोडक्यात बचावले

याबाबत अधिक माहिती अशी, संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव (ता. कन्नड) येथील भाविक जातेगाव येथे देवदर्शनासाठी ट्रक्टरने आले होते. जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन परतत असताना ट्रक्टर चालकाचे ट्रक्टरवरील नियंत्रण सुटले. व ट्रॅक्टर २०० फूट खोल पिनाकेश्वर घाटात कोसळला. या अपघातात कांताबाई गायके व कमलाबाई जगदाळे या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे हे जखमी झाले. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित पर्यटकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दरीत उतरत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर जखमींना बाहेर काढून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.

Nashik Accident News
Rajapur Accident | मिठगवाणे सागरी महामार्गावर टेम्पो उलटला; महिला मजूर ठार, ७ महिला गंभीर जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news