Mithgavane coastal highway tempo accident
मिठगवाणे येथील सागरी महामार्गावर उलटलेला टेम्पो (Pudhari Photo)

Rajapur Accident | मिठगवाणे सागरी महामार्गावर टेम्पो उलटला; महिला मजूर ठार, ७ महिला गंभीर जखमी

Ratnagiri Accident News | रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू
Published on

Mithgavane coastal highway tempo accident

राजापूर : मिठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी (दि.१३) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ७ महिला गंभीर जखमी झाल्या. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , आज सकाळी वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठाराकडे महिला मजुरांना घेऊन टेम्पो निघाला होता. यावेळी समोरून येणाऱ्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना टेम्पो चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो सुमारे १०० ते १५० फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला. यात टेम्पोतील सर्व महिला आणि एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाल्या. तसेच, टेम्पोचालक आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत.

Mithgavane coastal highway tempo accident
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

तातडीची मदत आणि उपचार

अपघातानंतर सर्व जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई

अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १५-२० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news