Nashik New CNG Pumps | सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर 41 नवीन सीएनजी पंप

Nashik New CNG Pumps | सध्या फक्त 10 ऑनलाइन पंपांवर ताण, कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाची मोठी तयारी
Mumbai CNG Price Hike
मुंबईत सीएनजी दराचा भडका !pudhari photo
Published on
Updated on

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात सीएनजी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात ४१ नवीन सीएनजी पंप सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज अतिरिक्त १ लाख किलो सीएनजी वितरण करण्याचा मानस असल्याची माहिती एमएनजीएलकडून मिळाली आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात दररोज ३ लाख किलोहून अधिक सीएनजी उपलब्ध होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Mumbai CNG Price Hike
Nashik Gangapur Dam | गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी 14.50 कोटी खर्च

सध्या शहरात इंधनटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील बहुतांश सीएनजी पंपांसमोर वाहनांच्या रांगा लागत असून, जिल्ह्यातील ६६ पैकी केवळ १० पंप ऑनलाइन कार्यरत आहेत. उर्वरित पंपांवर नियमित पुरवठा नसल्यामुळे ऑनलाइन पंपांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

वाढत्या पेट्रोल - डिझेल दरांमुळे सीएनजी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. प्रशासनाने डिसेंबरपर्यंत ९० ते १०७ पंपांद्वारे सीएनजी वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, त्यातील केवळ १७ ते १८ पंप ऑनलाइन असणार असल्यामुळे सिंहस्थ काळात येणाऱ्या लाखो वाहनांचा भार ही व्यवस्था पेलू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mumbai CNG Price Hike
Nashik Pre Monsoon Works | मनपाच्या पावसाळापूर्व कामांचा खोळंबा

देश - विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांसह लाखो वाहने नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने सीएनजीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक सीएनजी वाहने नोंदणीकृत असून, त्यासाठी मोजकेच ऑनलाइन पंप उपलब्ध आहेत. चेहेडी, विल्होळी आणि पंचवटी येथील एमएनजीएलच्या पंपांवर सिटीलिंकच्या सुमारे १५० बसेसमध्ये सीएनजी भरले जात असल्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यांपर्यंत पोहोचत असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढत आहे.

सीएनजी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी कालबद्ध नियोजन केले आहे. कुंभमेळ्यापूर्वी जिल्ह्यात ४१ सीएनजी पंप सुरू करून दररोज ३ लाख किलोहून अधिक गॅस वितरणाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित केले आहे. जास्तीत जास्त पंप ऑनलाइन करणे आणि पाइपलाइनद्वारे पुरवठा वाढवून इंधनटंचाई टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.

- रोहितकुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी

इंधन टंचाईच्या काळात सीएनजी हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये सीएनजी दरातील तफावत कमी करणे गरजेचे आहे. कुंभमेळ्याच्या काळात लाखो वाहने शहरात येणार असल्याने जास्तीत जास्त पंप ऑनलाइन

- अतुल मते, आडगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news