Nashik Weather Update | नाशिककर घामाघूम! सलग दुसऱ्या दिवशी पारा चाळिशी पार; उष्णतेच्या झळांनी शहर होरपळले

Nashik Weather Update | गेल्या एप्रिल अखेरीस नाशिकच्या तापमानाने चाळिशी ओलांडल्यानंतर, मागील दोन दिवसांपासून नाशिकचा पारा पुन्हा एकदा चाळिशी पार गेला आहे.
Solapur News
एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा पारा 43 अंश पार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या एप्रिल अखेरीस नाशिकच्या तापमानाने चाळिशी ओलांडल्यानंतर, मागील दोन दिवसांपासून नाशिकचा पारा पुन्हा एकदा चाळिशी पार गेला आहे. त्यामुळे नाशिककरांना तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असून, दुपारच्या सुमारास नाशिककर घराबाहेर पडणे टाळत आहेत.

Solapur News
Farmer Death | कांद्यासाठी धाव; काळानेच गाठले !

रविवारी (दि.१०) नाशिकचे कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. 10 -10- -20 -30- एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिकचे तापमान ४१ अंशांच्या पार गेले होते. त्यानंतर तापमानात सातत्याने घट झाली. चालू मे महिन्याच्या प्रारंभी तापमान ३७अंशांपर्यंत खाली आले होते.

त्यातच ढगाळ वातावरण असल्याने, उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्याने, नाशिककर घामाघुम झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने, नाशिककर घराबाहेर पडणे टाळत आहेत.

Solapur News
Onion Price Drop Nashik | कांद्याला 50 पैसे किलो दर! सटाणा बाजार समितीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; संताप अनावर

शनिवारी (दि.९) कमाल तापमान ४०. १ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेल्यानंतर, रविवारी तापमानात काहीशी वाढ होऊन ४०.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मे महिन्यात नाशिकचा पारा ४४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नाशिककरांना उन्हाळा तापदायक जाण्याची शक्यता आहे.

सुपर सण्डे; बाजारपेठ सामसूम

सुट्टीच्या रविवारी शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठ ग्राहकांनी गजबजत असतात. मात्र, उन्हाचा कडाका वाढल्याने, दुपारच्या सुमारास बाजारपेठा सामसूम असल्याचे दिसून आले. तुरळक ग्राहक वगळता, बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. सायंकाळनंतर मात्र, पुन्हा एकदा बाजारात ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news