Onion Price Drop Nashik | कांद्याला 50 पैसे किलो दर! सटाणा बाजार समितीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; संताप अनावर

Onion Price Drop Nashik | सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा आंदोलन: भारत दिघोळे
Onion Price
Onion Price Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव सातत्याने कोसळत असून, दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. परिणामी, शेतकरी आज नफा तर दूरच, पण उत्पादन खर्चसुद्धा वसूल करू शकत नाही.

Onion Price
Nashik Tree Census 2026 | नाशिकच्या निसर्गसंपदेत वाढ! शहरातील वृक्षांची संख्या 50 लाखांच्या पार; मनपाची नवी गणना अंतिम टप्प्यात

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. सटाणा बाजार समितीत एका शेतकऱ्याला ५० पैसे किलो असा कवडीमोल दर मिळाल्याने, त्याने उद्वेगातून आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी तातडीने राज्य सरकारने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.

जिल्ह्यातील सटाणा बाजार समितीत तर परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. तेथे एका शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा ५० रुपये क्विंटल म्हणजे ५० पैसे किलो इतका अत्यंत कमी दर मिळाला. ज्या कांद्याला पिकवण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात, त्या कांद्याची किंमत आज पाण्यापेक्षाही कमी झाली आहे.

Onion Price
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपात हप्तेखोरीचा 'विळखा'! अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

या घटनेमुळे संतप्त झालेल्या संबंधित शेतकऱ्याने बाजार समितीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी संघटनेकडे दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याला अत्यंत कमी दर पुकारण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आणि कांदा लिलाव बंद पाडले. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांचा रोष उघडपणे दिसू लागला आहे.

शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना सरकार मात्र फक्त बैठका, समित्या आणि घोषणांमध्ये व्यस्त आहे. शेतकऱ्यांना आता आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष निर्णय हवे आहेत. लाखो शेतकऱ्यांचा कांदा अत्यंत कमी दरात विकला गेला आहे.

अनेकांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. म्हणून अशा सर्व शेतकऱ्यांना किमान १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान तातडीने देणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे. शासनाचे निर्णय जमिनीवर दिसले पाहिजेत. अन्यथा राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news