Nashik faces fodder management challenge amid rising cattle purchases |दुधाळ जनावरे खरेदीत वाढ

Nashik faces fodder management challenge amid rising cattle purchases- जिल्हा प्रशासनासमोर वाढीव चारा नियोजन करण्याचे आव्हान
fodder management
fodder management
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाचा चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना, नाशिक जिल्ह्यात मात्र दुधाळ जनावरांच्या खरेदीकडे पशुपालक शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा, तुलनेने अनुकूल पाणीस्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची पशुपालकांच्या क्षमतेमुळे गायी म्हशींच्या संगोपनाला प्राधान्य दिले जात आहे.

fodder management
Nashik Simhastha Kumbh Mela 2027| सिंहस्थ स्वागतासाठी 'नाशिक महोत्सव'

जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि जलस्रोतांची उपलब्धता पशुपालनास अनुकूल ठरत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा, विहिरी व अन्य जलस्रोतांमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुलनेने नियंत्रणात ठेवणे शक्य होत आहे. आगामी काळात शासनाच्या माध्यमातून चारा उपलब्धतेचे नियोजन होण्याची शक्यता असल्यामुळे पशुपालकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. दुसरीकडे नाशिकशेजारील काही जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

fodder management
Nashik Phata Road Potholes: नाशिक फाटा चौकात खड्ड्यांची ‘मलमपट्टी’! सिमेंटचे गट्टू टाकल्याने वाहतूक मंदावली, अपघाताचा धोका

परिणामी जनावरांसाठी चारा आणि पाण्याची र उपलब्धता कमी होत असून, पशुपालकांसमोर मोठे संकट आहे. चाऱ्याचा वाढता खर्च आणि पाणीटंचाईमुळे काही पशुपालकांना आपले पशुधन विक्रीस काढण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पशुधन न खरेदी विक्रीचे जिल्हानिहाय अधिकृत तुलनात्मक आकडे उपलब्ध नसले, तरी जिल्ह्यात चाऱ्याची मागणी - नियोजित प्रमाणापेक्षा वाढल्याचे चित्र आहे. पशुधन २ संगोपनाकडे वाढता कल लक्षात घेता, आगामी काळात चारा उपलब्धतेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

वैरण उपलब्धतेची कसोटी

जिल्ह्यातील पशुधनाची वाढती गरज लक्षात घेऊन चारा उत्पादन, साठवणूक, चारा डेपो आणि वैरण उपलब्धतेचे नियोजन करण्याचे आव्हान आता पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे. पाण्याची उपलब्धता ही पशुपालनासाठी जमेची बाजू ठरत असली, तरी वाढत्या पशुधनाला पुरेसा चारा मिळवून देणे हीच आगामी काळातील खरी कसोटी ठरणार आहे.

पशुपालकांसाठी जमेची बाजू

धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा.

विहिरी, तलाव, अन्य जलस्रोतांमुळे पिण्याच्या पाण्याची सोय.

चारा उत्पादन आणि साठवणुकीसाठी तुलनेने अनुकूल परिस्थिती.

दुष्काळी परिस्थितीत पशुधन टिकविण्याचा पशुपालकांचा प्रयत्न.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.