Shiv Sena UBT Nashik | निष्ठावंत नव्हे, निष्क्रिय बाजूला सारले : मिर्लेकर

Shiv Sena UBT Nashik | शहरातील संघटनात्मक बांधणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.
Parbhani Shiv Sena UBT
Parbhani Shiv Sena UBTpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना (उबाठा) तर्फे जाहीर करण्यात आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील नियुक्त्यांमध्ये निष्ठावंतांना नव्हे तर निष्क्रिय, मोनोपॉली करणाऱ्यांना बाजूला सारण्यात आल्याचा दावा करत उबाठा उपनेते तथा नाशिक 1 जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. शहरातील संघटनात्मक बांधणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.

Parbhani Shiv Sena UBT
Nashik MLC Election 2026 | भाजपचे 'ते' नऊ नगरसेवक गोत्यात ?

महानगर कार्यकारिणीतील उपमहानगरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, प्रभागप्रमुख, शाखा प्रमुखपदांच्या नियुक्त्या महिनाभरात जाहीर होतील, त्यात काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल. निष्ठावंतांच्या जोरावरच ही संघटना शिवसेनाप्रमुखांनी उभी केली, असे स्पष्टीकरण मिर्लेकर यांनी दिले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्षाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. त्यात पक्षातील निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा तसेच विशिष्ट गटाच्या कार्यकर्त्यांना बढती दिल्याचा आरोप होत आहे. संघटनात्मक बैठकांच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या मिर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले. x

महानगर कार्यकारिणीतील उपमहानगरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, प्रभागप्रमुख, शाखा प्रमुखपदांच्या नियुक्त्या महिनाभरात जाहीर होतील, त्यात काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल. निष्ठावंतांच्या जोरावरच ही संघटना शिवसेनाप्रमुखांनी उभी केली, असे स्पष्टीकरण मिर्लेकर यांनी दिले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्षाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. त्यात पक्षातील निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा तसेच विशिष्ट गटाच्या कार्यकर्त्यांना बढती दिल्याचा आरोप होत आहे. संघटनात्मक बैठकांच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या मिर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले.

जुन्या-नव्यांचा समन्वय साधून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या आहेत. पक्षसंघटनेच्या बळकटीकरणात अडथळे ठरणारे, पक्षाला न परवडणारे काही निष्क्रिय पदाधिकारी हटविण्यात आले आहेत. त्यामुळे निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप चुकीचा असल्याचे मिर्लेकर म्हणाले. महानगरप्रमुखांची फेरनियुक्ती झाली असली तरी अद्यापही महानगर कार्यकारिणीतील उपमहानगरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख आदी नियुक्त्या घोषित करणे बाकी आहे.

त्यादृष्टीने काही बैठका पार पडल्या. महिनाभरात या नियुक्त्या जाहीर करून सक्षमपणे संघटना उभी करू, निष्ठावंतांच्या जोरावरच हा पक्ष उभा आहे, असा दावा मिर्लेकर यांनी केला. यावेळी उपनेते दत्ता गायकवाड, खा. राजाभाऊ वाजे, लोकसभाप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, गटनेते केशव पोरजे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठांना निरीक्षकपदाची संधी

पक्षाच्या जुन्या नेत्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यांना निरीक्षकपदावर काम करण्याची संधी दिली जाईल, असे मिर्लेकर यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

त्यात जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यात आली. एसआयआर अंतर्गत उबाठाच्या मतदारांना वगळले जाणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून, १५ दिवसांत तालुकानिहाय कार्यकारण्या घोषित केल्या जातील, असेही मिर्लेकर यांनी सांगितले.

Parbhani Shiv Sena UBT
Goa Fishing Ban | मच्छीमारांना कडक इशारा! बंदीच्या काळात मासेमारी केल्यास परवाना कायमचा होणार रद्द; गोव्यात 61 दिवसांची बंदी लागू

प्रभागनिहाय जनता दरबार

शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात मिर्लेकर यांच्या उपस्थितीत उबाठा नगरसेवकांची बैठक पार पडली. सिंहस्थ कामांच्या नावावर शहरात सर्वत्र रस्ते खोदण्यात आले आहेत. त्या विरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्याच्या सूचना नगरसेवकांना या बैठकीत देण्यात आल्या. त्याचप्रमाणे प्रभागनिहाय जनता दरबाराचे आयोजन केले जाणार असून, खा. राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या जनता दरबारात उपस्थित राहणार असल्याची माहिती मिर्लेकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news