Nashik |एकाच विवाह सोहळ्यात दोन्ही शिवसेनेचे मोठे नेते एकत्र

Nashik Shiv Sena leaders- सोशल मीडियावर फोटो व्हायरल : राजकीय चर्चेला उधाण
 Nashik Shiv Sena leaders
नाशिक : विवाहसोहळ्याप्रसंगी शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दादा भुसे, अजय बोरस्ते, तर उबाठा गटाचे रवींद्र मिर्लेकर व वसंत गिते
Published on
Updated on

नाशिक : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे १० ते १२ माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने पक्षफुटीची चर्चा तापलेली असताना, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यासोबत ठाकरे गटाचे संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर आणि माजी आमदार वसंत गिते एकत्र पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. ही भेट निव्वळ योगायोग आहे की यामागे काही राजकीय सस्पेन्स दडला आहे, याबाबत शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'चे जोरदार हादरे आता नाशिकमध्येही जाणवू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी उबाठाचे नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची वार्ता येऊन धडकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यातच उबाठाचे गटनेता केशव पोरजे यांनी काही मध्यस्थांमार्फत नगरसेवकांना पक्षांतरासाठी मोठी आमिषे दाखविली जात आहेत.

 Nashik Shiv Sena leaders
Nashik Kalwan road accidents|कळवण मार्गाचे काम की मृत्यूचा सापळा ?

१० नगरसेवक आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा प्रभाग निधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. यात एका वकिलाचा समावेश असून, ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचे आहे, तोच ५ ते ६ नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यावेळी या संपूर्ण प्रकरणाला तेव्हा गंभीर वळण मिळाले. नगरसेवकफुटीच्या बातम्या केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट करत गटनेते पोरजे यांनी १५ पैकी १३ नगरसेवकांची माध्यमांसमोर परेड घडवून आणत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

दरम्यान, महापालिकेतील शिवसेना 'उबाठा' गटातील नगरसेवक फुटू नयेत आणि कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी तातडीने नाशिकला धाव घेत 'डॅमेज कंट्रोल' सुरू केले. रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये दाखल होत त्यांनी शनिवारी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. नगरसेवकांनी देखील कितीही आमिषे दाखवली, तरी आपण पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचा शब्द मिर्लेकरांना दिला.

 Nashik Shiv Sena leaders
Nashik sowing delay | नाशिक विभागातील ४५ टक्के पेरण्या रखडल्या

ही बैठक होत नाही तोच, सायंकाळी एका विवाहसोहळ्यात दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र दिसून आले. एकाच फ्रेममध्ये सर्व नेते असल्याचा फोटो रविवारी (दि.१२) व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news