नाशिक : आनंदाच्या शिध्याला सर्व्हरचे “विघ्न’

नाशिक : आनंदाच्या शिध्याला सर्व्हरचे “विघ्न’
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना पुरवठा विभागाच्या ई-पॉस मशीन्स‌्चा सर्व्हर वारंवार डाउन होत आहे. त्यामुळे आनंदाच्या शिधा वाटपात विघ्न निर्माण होत आहे. वेळेत शिधा हाती पडत नसल्याने लाभार्थींमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

संबधित बातम्या : 

राज्य शासनाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्डधारक लाभार्थींना शंभर रुपयांमध्ये चार जिन्नस असलेला आनंदाच्या शिध्याचा संच उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संचात प्रत्येकी एक किलो साखर, रवा व चणाडाळ तसेच एक लिटर खाद्यतेलाचा समावेश आहे. जिल्ह्यातील २ हजार ६०९ रेशन दुकानांमधून या शिध्याचे वाटप सुरू केले आहे. एकूण ७ लाख ७८ हजार २०३ लाभार्थी कुटुंबांना हा संच दिला जाणार आहे. त्यामध्ये १ लाख ६९ हजार ८४५ अंत्योदय व ६ लाख ८ हजार ३५८ प्राधान्य शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून या संचाचे वाटप सुरू केले. मात्र, ई-पॉस मशीन्स‌्च्या सर्व्हर डाउनच्या समस्येमुळे शिधावाटपात अनंत अडचणी निर्माण होत आहेत. मशीनवर संच वितरणाची डेटा एन्ट्रीसाठी वेळ लागत आहे. त्यामुळे लाभार्थींना तासन‌्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. लाभार्थी थेट दुकानदारांशी हुज्जत घालत आहेत. त्यामुळे या प्रश्नी तातडीने मार्ग काढत दिलासा द्यावा, अशी मागणी रेशन दुकानदारांकडून केली जात आहे.

१.३० लाख संचांचे वाटप

जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार शुक्रवार (दि.१५)पर्यंत एक लाख ३० हजार ६५० संचांचे लाभार्थींना वितरण केले. एकूण लाभार्थींच्या तुलनेत १७ टक्के इतके हे प्रमाण आहे. गणेश स्थापनेपूर्वी नागरिकांना संच उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मार्ग काढावा

दोन दिवसांपासून सर्व्हरला अडचणी येत असून, वारंवार चालू-बंद पडतो आहे. परिणामी, लाभार्थी नाराज होऊन परतत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या प्रश्नी मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे राज्याध्यक्ष गणपत डोळसे-पाटील व जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news